agriculture news in Marathi government support to DCC bank Maharashtra | Agrowon

राज्यातील पंधरा जिल्हा बँकांना शासनाकडून ‘आर्थिक’ बळ

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

राज्यातील अनेक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका डबघाईस आल्या असतानाच राज्यातील पंधरा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना शासनाकडून आर्थिक बळ दिले जाणार आहे.

लातूर ः राज्यातील अनेक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका डबघाईस आल्या असतानाच राज्यातील पंधरा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना शासनाकडून आर्थिक बळ दिले जाणार आहे. या बँकांना शासकीय व्यवहार करण्यास तसेच सार्वजनिक उपक्रम, महामंडळाकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीसाठी शासनाने आता मान्यता दिली आहे. यातील बहुतांश बँकेवर सत्ताधाऱ्यांचेच वर्चस्व आहे. त्यामुळे पुढील काळात राष्ट्रीयकृत बँकांकडून शासकीय खाती जिल्हा बँकेत जाण्याची शक्यता आहे. 

शासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, महामंडळाकडील बँकिंग विषयक व्यवहार केवळ राष्ट्रीयकृत बँकांमार्फत करण्याचे धोरण होते. त्यामुळे शासकीय बँकिंग व्यवहार व अतिरिक्त निधी केवळ राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ठेवला जात होता. पण आता शासनाने आता या निर्णयात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे आदेशही गुरुवारी (ता. १३) काढले आहेत. 

शासकीय निधीची सुरक्षितता विचारात घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व नियमानुकूल व्यावसायिकता बाळगणाऱ्या तसेच इतर काही निकष पूर्ण करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसंदर्भात सहकार, वस्त्रोद्योग व पणन विभागाकडून शासनाने काही दिवसांपूर्वी अभिप्राय मागून घेतला होता. या विभागाने पाच वर्षातील लेखा परीक्षण अहवाल अ वर्ग असणाऱ्या १५ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आर्थिकदृष्ट्या सक्षम व नियमानुकूल व्यावसायिकता बाळगणाऱ्या बँका म्हणून शिफारस केली आहे. त्यानुसार आता शासनाने या पंधरा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना शासकीय बँकिंग व्यवहार करण्यास तसेच सार्वजनिक उपक्रम, महामंडळाकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीसाठी शासनाने मान्यता दिली आहे. 

सद्यःस्थितीत या बँकांनी वेतन व निवृत्तिवेतन प्रदानाकरिता शासनासोबत आवश्यक करार केलेला नाही. त्यामुळे त्यांनी करार केल्यास या बँकांना वेतन व निवृत्तिवेतन प्रदानाकरिता प्राधिकृत करण्याबाबतचे आदेश स्वतंत्रपणे काढले जाणार आहे. तसेच शासकीय मालकीच्या असलेल्या आयडीबीआय आणि प्रादेशिक ग्रामीण बँकेत महाराष्ट्र ग्रामीण बँक व विदर्भ कोकण ग्रामीण बँकेला देखील, अशी मान्यता देण्यात आली आहे. 

राज्यातील अनेक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांविषयी ग्राहकांचा वाईट अनुभव आहे. राजकीय लोकाच्या हातात या बँका असल्याने अनेक बँका तोट्यात गेल्या आहेत. त्याचा फटका ग्राहकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. आता शासकीय बँकिंग व्यवहार व अतिरिक्त निधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ठेवण्याचा निर्णय घेऊन शासनाने अशा बँकांवर मोठा विश्वास टाकला आहे. ते या विश्वासास पात्र ठरतील का? हे येत्या काळात दिसून येणार आहे. 

या बॅंकांचा समावेश 
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, लातूर, अकोला, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या १५ मध्यवर्ती बँकांचा समावेश आहे. 
 


इतर अॅग्रो विशेष
बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार?शेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...
पावसाने पुन्हा दाणादाणपुणेः मराठवाड्यासह नाशिक, नगर, पुणे आणि...
फवारणी विषबाधाप्रकरण स्वित्झर्लंडच्या...यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी २०१७...
अभूतपूर्व गदारोळात कृषी विधेयके मंजूरनवी दिल्ली: गगनभेदी घोषणा, धक्काबुक्की,...
‘आत्मा’चे पंचवार्षिक आराखडे रखडलेपुणे: शेतकऱ्यांपर्यंत कृषी विषयक योजना कशा...
‘पोकरा’ प्रकल्पातील वैयक्तिक लाभ...नांदेड : कोरोना (कोवीड -१९) संसर्गामुळे शासनाच्या...
मूग खरेदी एक ऑक्टोबरपासूनमुंबई: हमीभावाने मूग खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव...
मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यतापुणे ः राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार...
मुसळधार पावसाचा तडाखापुणे ः  मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही...
कुटुंबातील सदस्याला शेतकरी अपघात विमा...पुणे ः गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा...
मैत्रीची अन्नधान्य व्यापारातील भागीदारी...आडगाव (जि. नाशिक) येथील गोरक्ष लभडे आणि संदीप...
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...