दुष्काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : मुख्यमंत्री

दुष्काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी
दुष्काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी

हिंगोली : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ५० हजार कोटी रुपयांची मदत केली आहे. केंद्र तसेच राज्य सरकार दुष्काळी स्थितीत शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहे. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने गेल्या तीन वर्षांत पीकविमा परताव्यापोटी शेतकऱ्यांना १२ हजार कोटी रुपये अदा केले. कर्जमाफी योजनेचा लाभ शेवटच्‍या शेतकऱ्यांच्‍या बँक खात्‍यात पैसे जमा होईपर्यंत सुरू राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. हिंगोली नगरपालिकेतर्फे हिंगोली शहरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी (ता. ६) झाले. या वेळी रामलीला मैदानावर आयोजित शेतकरी आणि महिला बचत गटांच्या मेळाव्यामध्ये श्री. फडणवीस बोलत होते. या वेळी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, पालकमंत्री दिलीप कांबळे, राज्य कृषिमूल्‍य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार तान्‍हाजी मुटकुळे, माजी खासदार सूर्यकांता पाटील, ॲड. शिवाजी माने, सुभाष वानखेडे, माजी आमदार गजानन घुगे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, संघटनमंत्री भाऊराव देशमुख, नगरसेवक गणेश बांगर, रामरतन शिंदे, मिलिंद यंबल, पी. आर. देशमुख आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणीवीस पुढे म्हणाले, शिवरायांच्या आशीर्वादाने राज्य सरकार काम करीत आहे. शेवटच्या माणसापर्यंत काम करीत वेगवेगळे निर्णय घेत हे सरकार वाटचाल करीत आहे. हंगामाच्‍या सुरवातीचे शेतीमालाचे दर आणि हंगाम संपतानांचे दर यामधील तफावत दूर करण्यासाठी लवकरच योग्‍य तो निर्णय घेतला जाईल. कृषी समृद्धी प्रकल्‍पातून मराठवाडा आणि विदर्भामध्ये ६ हजार कोटी रुपयांची कामे केली जातील. केंद्र तसेच राज्‍यातील सरकारने सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबवल्‍या आहेत. त्‍यामुळे जनतेला या सरकारांबद्दल आपलेपणाची भावना निर्माण झाली आहे. मात्र सत्तेसाठी हापापलेले अनेक पक्षांचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या विरोधात एकत्र आले आहेत. या नेत्‍यांना विकास नको तर सत्ता हवी आहे. जनतेने त्‍यांना जागा दाखवून द्यावी असे आवाहन त्‍यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com