Agriculture news in marathi Government system of milk collection in Sindhudurg is in disarray | Agrowon

सिंधुदुर्गात दुध संकलनाची शासकीय यंत्रणा मोडकळीस

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 जुलै 2020

खाद्य, चारा आणि देखभालीचा विचार केला, तर मिळणारा दर परवडत नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून थेट दुध विक्री करतो. त्यातून संस्थेकडून मिळणाऱ्या दरापेक्षा दहा ते बारा रूपये अधिक दर मिळतो.
- मनोहर रावराणे, शेतकरी,नावळे. ता. वैभववाडी.

खासगी दुध संघांनी दुध संकलन सुरू केल्यानंतर शासकीय दुध डेअरी संकलनाचे मार्ग बंद झाले. अनेक संस्थांनी खासगी दुध संघांना दुध देण्यास सुरूवात केली. सन २०११ नतंर संकलन पूर्ण थांबल्यामुळे अखेर डेअरी बंद झाली.
- गुरूनाथ जाधव, अधीक्षक, शासकीय डेअरी, कणकवली.

सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात दुध संकलन करणाऱ्या शासकीय दुध डेअऱ्या गेल्या नऊ वर्षांपासून बंद आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील दुग्धव्यावसायिक खासगी संघाना दुध विक्री करीत आहेत. सध्या जिल्ह्यात सुमारे २२ हजार लिटर दुध संकलन केले. म्हशीच्या दुधाला सरासरी ४० ते ४२, तर गायीच्या दुधाला २५ रूपये दर दिला जातो. त्यातच एका दुध सकंलन करणाऱ्या संस्थेने जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांचे २ कोटी रूपये थकविले आहेत.

दुध संकलनासाठी कणकवली येथे शासकीय दुध डेअरी कार्यरत होती. परंतु, या डेअरीकडे म्हणावे तितके कुणी लक्ष दिले नाही. त्यामुळे हळुहळु या डेअरीचे अस्तित्व सपंत गेले. परंतु २०११ पासून डेअरीने दुध संकलन बंद केले. सध्या जिल्ह्याचे दुध संकलन २२ हजार लिटर आहे. दरांबद्दल शेतकऱ्यांमध्ये सभ्रंम आहे. काही संघ म्हैशीच्या दुधाला ४० ते ४२ रूपये दर देतात. याशिवाय फॅटप्रमाणे त्यामध्ये वाढ देखील होते. तर, काही संस्था दुधाला ३८ ते ४० रूपये देतात. गायीच्या दुधाला सरासरी २५ रूपये दर दिला जातो. तर, काही संस्था २३ रूपये देखील दर देतात. 

संकलन करणाऱ्या एका संस्थेने जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांची दोन कोटीपेक्षा अधिक रक्कम थकविली आहे. सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ झाला, अद्याप त्या संस्थेकडून पैसे देण्याबाबत कोणतीही कार्यवाही सुरू झालेली नाही. पशुखाद्य, हिरवा चाऱ्यांच्या वाढलेल्या दरामुळे सध्या दुध संघ किवा दुध संस्थांकडून मिळणारा दर शेतकऱ्याला परवडत नाही. त्यामुळे शेतकरी ग्राहक शोधून दुध विक्री करताना दिसत आहेत.


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...जळगाव : खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...
औरंगाबाद, जालना, परभणीत बहुतांश मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी या तीनही...
नाशिक बाजार समितीतील कर्मचारी...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोलापूर जिल्हा परिषदेत सेसफंड, करनिधी...सोलापूर  ः कोरोनामुळे कधी नव्हे, ती सहा-सात...
नगर जिल्ह्यात शेततळ्यांच्या कामांची...नगर ः दुष्काळी परिस्थितीत शेततळ्याच्या पाण्यावर...
पूर्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा...हिंगोली  ः ‘‘जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील...
वाखारी येथे शेतकरी, शेतमजुरांना कौशल्य...पुणे ः कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १४२...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १४२...
दहिवडीत शेतीकामांच्या मजुरीदरांसह...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतीव्यवस्था...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात दीड लाख...औरंगाबाद  : दोन जिल्ह्यांतील साडेचार हजारावर...
उजनीची पाणीपातळी २८ टक्केवर सोलापूर  ः पुणे जिल्ह्यातील पावसाच्या...
वरखेडीतील पशुधनाचा बाजार उद्यापासून...पाचोरा, जि.जळगाव  ः वरखेडी (ता.पाचोरा) येथील...
जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांवर लिंबं...भडगाव, जि.जळगाव  ः जिल्ह्यात लिंबू पिकासाठी...
कृषी महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न...भंडारा : कृषी महाविद्यालयाच्या प्रस्तावित...
परभणी जिल्ह्यात कपाशी बियाण्याच्या साडे...परभणी : जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात विविध...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७०...वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग ः ऑगस्ट महिन्यात मुदत...
चंद्रपूर जिल्ह्यात कापूस कोंडीत भर...चंद्रपूर : येत्या  हंगामातील कापूस खरेदीसाठी...
पंधरा शेतकऱ्यांच्या सौरकृषी पंपात...चंद्रपूर : मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत...
जलालखेडा येथील दीडशे शेतकरी...नागपूर : खरीप कर्जाचे वाटप शनिवार (ता. १५) पर्यंत...
सांगली जिल्ह्यात डाळिंब संकटांच्या...सांगली ः वातावरणातील बदलाने डाळिंबावर तेलकट डाग...