फ्रूट वायनरी व्यवसायाला दिलासा; १ रुपया उत्पादन शुल्क आकारण्याचा निर्णय

फ्रूट वायनरी व्यवसायाला दिलासा; १ रुपया उत्पादन शुल्क आकारण्याचा निर्णय
फ्रूट वायनरी व्यवसायाला दिलासा; १ रुपया उत्पादन शुल्क आकारण्याचा निर्णय

मुंबई : फळ व मिड वाइन उद्योगाला चालना देण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने या उद्योजकांना द्राक्षाव्यतिरिक्त सर्व वाइन्स व मिड वाइन्सवर प्रति बल्क लिटर १ रुपया इतके नाममात्र उत्पादन शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. 

या नवीन निर्णयानुसार जांभूळ, चिकू, केळी, बोरे, करवंद इत्यादी फळांसह काजूच्या बोंडापासून वाइननिर्मितीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. याचा फायदा महाराष्ट्रातील फलोत्पादकांना होणार आहे. या निर्णयात समाविष्ट करण्यात आलेल्या सर्व फळांचे उत्पादन कोकण पट्ट्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे या भागातील फलोत्पादकांना या निर्णयाचा निश्चितच फायदा होईल.

द्राक्षांव्यतिरिक्त सर्व वाइन्स व मिड वाइन्सवर उत्पादन खर्चाच्या १०० टक्के उत्पादन शुल्क आकारण्यात येत होते. परिणामी इतर सौम्य मद्याच्या तुलनेत (बिअर व वाइन्स) या वाइन्स व मिड्स बऱ्याच महाग मिळतात. त्याचा परिणाम हा थेट विक्रीवर होत होता. बिअरच्या एका ३३० मिलि बाटलीची किंमत साधारण १५० ते १८० रुपये आहे. ७५० मिलिची साधारण टेबल वाइन २५० ते ४०० रुपये या दराने बाजारात मिळते.   या तफावतीचा परिणाम म्हणून हे वायनरी उद्योग दर महिना केवळ ७०० ते ८०० पेट्या महाराष्ट्रात विकू शकत होते. शिवाय गेल्या २ वर्षांत या उद्योगात केवळ ४ नवीन उद्योजक जोडले गेले आहेत. त्यामुळे या वाइन उद्योगास चालना मिळण्याकरिता तसेच सं‍बंधित शेतकरी व आदिवासींना प्रोत्साहन देण्याकरिता उत्पादन शुल्क विभागाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार जांभूळ, चिकू, केळी, बोरे, करवंद आदी फळांसह काजूच्या बोंडापासून तयार होणाऱ्या वाइन/मद्यावर प्रति बल्क लिटर १ रुपये इतके नाममात्र उत्पादन शुल्क आकारले जाणार आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या या निर्णयामुळे वाइन आणि इतर फळांपासून तयार होणाऱ्या मद्य उत्पादनाला चालना मिळेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com