agriculture news in marathi, Government to take initiative for Madgayal sheep conservation | Page 3 ||| Agrowon

काटक ‘माडग्याळ’ मेंढीचे होणार संवर्धन

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

मुंबई : राज्यात मांसासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘माडग्याळ’ मेंढीच्या संवर्धनासाठी तिचे उगमस्थान असलेल्या सांगली जिल्ह्यातील माडग्याळ (ता. जत) गावात संशोधन व संवर्धन केंद्र स्थापन करण्याचे राज्य शासनाच्या विचाराधीन आहे. देशातील अधिक मांस उत्पादन देणाऱ्या मेंढ्यांच्या जातींपैकी ‘माडग्याळ’ ही जात आहे. त्यामुळे ‘माडग्याळ’चे संगोपन व संवर्धन केल्यास राज्यातील मांस उत्पादनात वाढ होऊन निर्यातीस चालना मिळेल, असा हेतू आहे.

मुंबई : राज्यात मांसासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘माडग्याळ’ मेंढीच्या संवर्धनासाठी तिचे उगमस्थान असलेल्या सांगली जिल्ह्यातील माडग्याळ (ता. जत) गावात संशोधन व संवर्धन केंद्र स्थापन करण्याचे राज्य शासनाच्या विचाराधीन आहे. देशातील अधिक मांस उत्पादन देणाऱ्या मेंढ्यांच्या जातींपैकी ‘माडग्याळ’ ही जात आहे. त्यामुळे ‘माडग्याळ’चे संगोपन व संवर्धन केल्यास राज्यातील मांस उत्पादनात वाढ होऊन निर्यातीस चालना मिळेल, असा हेतू आहे.

भारत वगळता इतर बहुतांश देशांमध्ये दैनंदिन आहारात शेळीच्या मांसापेक्षा मेंढी मांसाचे अधिक सेवन केले जाते. ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया, तुर्की, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका व चीन आदी देशांमध्ये भारतातून मेंढीचे मांस निर्यात करण्यास मोठा वाव आहे. त्यातच राज्यातील मेंढ्यांची संख्या सातत्याने घटत चालल्याने कत्तलीसाठी पुरेशा प्रमाणात मेंढ्या उपलब्ध होत नाहीत. परिणामी, मेंढी मांसाच्या निर्यातीतही घट होत आहे. तसेच, राज्यात संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायद्याची अंमलबजावणी होत असल्याने बीफची उपलब्धता कमी होत आहे. ही कमतरता मेंढी मांसातून काही अंशी भरून काढता येऊ शकेल, असाही एक विचार आहे. 

चरण्याच्या सवयीमुळे मेंढ्या जमिनीलगतचे गवत खात असल्यामुळे जंगलाची हानी होत नाही. मेंढ्या लवकर वयात येतात, त्यांचा इतर जनावरांच्या तुलनेत गाभण काळ कमी असतो, त्यामुळे दोन वर्षांच्या कालावधीत त्या तीनवेळा वेतात. जरी मेंढ्यांची दूध उत्पादन क्षमता कमी असली तरी गाय व शेळीच्या दुधाच्या तुलनेत मेंढीच्या दुधाचे पोषणमूल्य जास्त आहे. अत्यंत कमी भांडवलातसुद्धा हा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. त्यामुळे राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उत्पन्नाचे खात्रीशीर साधन देणारा व्यवसाय म्हणून मेंढीपालनच्या विकासाचे उद्दिष्ट आहे.

देशपातळीवर माडग्याळ, मारवाडी, जैसलमेरी या मेढ्यांच्या जाती प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. तर, राज्यात प्रामुख्याने दख्खनी, माडग्याळसह काही गावठी मेंढ्यांच्या जाती आहेत. यापैकी माडग्याळ ही मेंढी जात मांसासाठी प्रसिद्ध असून, ही जात काटक आहे. इतर मेंढ्यांच्या तुलनेत अधिक रोगप्रतिकारक आहे. माडग्याळ नराचे वजन सर्वसाधारण ४० ते ५० किलो, तर मादीचे वजन ३५ ते ४० किलो इतके असते. त्यामुळे देशातील अधिक मांस उत्पादन देणाऱ्या मेंढ्यांच्या जातींपैकी माडग्याळ ही जात प्रमुख मानली जाते.

माडग्याळ मेंढी संगोपन व संवर्धनास प्रोत्साहन दिल्यास मेंढी मांसनिर्यातीतून शेतकऱ्यांना परकी चलन मिळण्यास मदत होईल, असा अंदाज आहे. या संशोधन केंद्रास राष्ट्रीय कृषी विकास योजना तसेच पुण्यश्लोक अहल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी महामंडळ, पुणे यांच्याकडून निधी उपलब्ध करून देण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे.

प्रतिकूल वातावरणात तग धरतात
उष्ण तापमान, अवर्षणप्रवण क्षेत्र, वारंवार उद्भवणाऱ्या चाराटंचाई परिस्थितीत गाई, म्हैस व शेळ्यांच्या तुलनेत प्रतिकूल वातावरणात तग धरणारा मेंढी हा एकमेव प्राणी आहे. मेंढीमध्ये गाय, म्हैस व शेळीच्या तुलनेत कमी प्रतीच्या चाऱ्याचे सेवन करून त्याचे मांसात रूपांतर करण्याची क्षमता जास्त असते. तसेच मेंढ्यांच्या कातडी व लोकरीपासून तयार होणाऱ्या साहित्याच्या उद्योगाला चालना मिळेल आणि लेंडी खताचा उपयुक्त सेंद्रिय खत म्हणूनसुद्धा वापर करता येईल, त्यामुळे आर्थिक अडीअडचणीत तातडीने उत्पन्न देणारे मेंढीपालन इतर कोणत्याही पशुपालन व्यवसायाच्या तुलनेत किफायतशीर विशेषतः दुष्काळी शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पन्न देऊ शकते.


इतर अॅग्रो विशेष
यंदा पायी वारी नाही; दशमीला पंढरीत...पुणे : आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी राज्य शासन...
अरबी समुद्रातून मॉन्सूनची पुढे चालपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
राज्यात आजपासून पूर्वमोसमी पावसाची...पुणे  : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक...
टोळधाडीच्या अस्तित्वाने विदर्भात पसरली...नागपूर   ः टोळधाड मध्यप्रदेशात...
दूध संघांना पेमेंट वाटप सुरुपुणे : राज्यातील दूध संघांनी शेतकऱ्यांना दिलेल्या...
वस्त्रोद्योग येतोय पूर्वपदावरजळगाव ः लॉकडाउनमुळे ठप्प असलेला देशातील...
नाशिक बाजार समिती पुन्हा सुरु;...नाशिक  : नाशिक बाजार समितीत दोन कोरोनाबाधित...
थेट पपई विक्रीतून मिळविला तिप्पट दर !परभणी ः कोरोनाच्या स्थितीमध्ये लॉकडाऊन व...
शेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध...मुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार...
अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच पूरस्थिती...मुंबई : अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच...
शेतकऱ्यांची अडवणूक झाली, तर...नगर : ‘‘शेतकऱ्यांसाठी काम करणे याला आपण सर्वांनी...
मॉन्सून अरबी समुद्रात; सोमवारपर्यंत...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
सहकाराच्या त्रिस्तरीय रचना मोडण्यास...पुणे : राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
उद्यापासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज;...पुणे : राज्यात अक्षरशः भाजून काढणाऱ्या उन्हापासून...
`गोकुळ' ची ४५ लाख लिटर दुधावर प्रक्रिया कोल्हापूर ः लॉकडाउनच्या काळात कोल्हापूर...
पीककर्जासाठी हेलपाटे, भ्रष्ट...संग्रामपूर, जि. बुलडाणा : वेळ सकाळी साधारण...
टोळधाडीमुळे अवघे ५० हेक्‍टरचे नुकसान :...नागपूर: टोळधाडीचा धोका अमरावती विभागात टळला असला...
राज्यात ४० हजार टन दूध पावडर पडूनपुणे : राज्यात ४० हजार टन दूध पावडर (भुकटी) पडून...
मागणीपेक्षाही एक लाख क्विंटल बियाणे...पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असले...
दुग्धव्यवसायातून शेतीला दिला सक्षम...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ...