जळगाव जिल्ह्यात शासकीय तूर खरेदी आजपासून

शासकीय तूर खरेदी आजपासून
शासकीय तूर खरेदी आजपासून

जळगाव  ः जिल्ह्यात शासकीय तूर खरेदी रविवारपासून (ता. १) सुरू होत आहे. जामनेर येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते तूर खरेदीची सुरुवात केली जाईल.  तूर खरेदीसंबंधी जिल्ह्यात निर्देशित केंद्रांमध्ये शेतकऱ्यांची नोंदणी सुरू आहे. ही नोंदणी आणखी १५ दिवस म्हणजेच १५ मार्चपर्यंत सुरू राहील. २६०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यात जामनेरसह पाचोरा, चाळीसगाव, भडगाव, मुक्ताईनगर, बोदवड, रावेर, चोपडा, जळगाव, अमळनेर येथे तूर खरेदी सुरू होईल. या केंद्रांमधील खरेदी पुढील आठवड्यात सुरू होण्याचे संकेत आहेत. टप्प्याटप्प्याने ही सर्व केंद्र सुरू होतील. ५८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर दिला जाईल. हेक्‍टरी ६.६४ क्विंटल तूर खरेदी केली जाईल.  शासकीय तूर खरेदी लांबल्याने अनेक शेतकऱ्यांना बाजारात तूर विक्री करावी लागली. बाजारात तुरीचे दर ४२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. दर परवडत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तुरीची मळणी खानदेशात जानेवारीच्या मध्यात जवळपास पूर्ण झाली. शासकीय तूर खरेदी वेळेत सुरू न झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात अमळनेर, चोपडा येथील बाजारात तुरीची आवक बऱ्यापैकी आहे. अमळनेरात बाजार समितीत या आठवड्यात प्रतिदिन सरासरी १५० क्विंटल तुरीची आवक झाली. जळगाव येथील बाजारात मात्र तुरीची आवक कमी आहे. हरभरा खरेदी सुरू होणार शासन हरभऱ्याची जिल्ह्यात सुमारे १२ केंद्रांवर खरेदी करणार आहे. शासकीय केंद्रात हरभरा विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. ही नोंदणी जिल्ह्यात चोपडा,जामनेर, जळगाव, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, मुक्ताईनगर, बोदवड, अमळनेर येथे सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना सातबारा उतारा (हरभरा पीक नोंद असलेला), बॅंक पासबुकची झेरॉक्‍स व आधार क्रमांक सादर करून संबंधित केंद्रात नोंदणी करून घ्यायची आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com