agriculture news in marathi, government wait for patanjali and reliance milk asks dhananjay munde | Agrowon

सरकार रिलायन्स, पतंजलीच्या दुधाची वाट पाहत आहेत का? : धनंजय मुंडे
सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

नागपूर : एकीकडे समाधानकारक पाऊस पडत असताना शेतातील कामे करण्याऐवजी शेतकऱ्यांवर भरपावसात रस्त्यावर दूध ओतुन आंदोलन करण्याची वेळ सरकारने आणली आहे. दुध उत्पादक शेतकरी मरत असताना सरकार दुधाला भाव देण्यासाठी रिलायन्सची दुध डेअरी आणि पतंजलीचे दुध बाजारात येण्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

नागपूर : एकीकडे समाधानकारक पाऊस पडत असताना शेतातील कामे करण्याऐवजी शेतकऱ्यांवर भरपावसात रस्त्यावर दूध ओतुन आंदोलन करण्याची वेळ सरकारने आणली आहे. दुध उत्पादक शेतकरी मरत असताना सरकार दुधाला भाव देण्यासाठी रिलायन्सची दुध डेअरी आणि पतंजलीचे दुध बाजारात येण्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

राज्यात सुरू असलेल्या दुधाच्या आंदोलनाच्या अनुषंगाने या प्रश्नासंदर्भात विधानपरिषदेत चर्चा मार्च महिन्यात मुंबईच्या विधानभवनावर शेतकऱ्यांचा पायी मोर्चा आला आणि आता शेतकऱ्यांना रस्त्यावर दुध ओतावे लागत आहे. प्रत्येकवेळी रस्त्यावर उतरल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय द्यायचाच नाही, असे सरकारने धोरण ठरवले आहे काय? असा प्रश्न त्यांनी केला. 

सरकारने 26 जून 2017 रोजी गाईच्या दुधाला 27 रूपये आणि म्हशीच्या दुधाला 36 रूपये भाव जाहीर केला. मात्र, शेतकऱ्यांना केवळ 17 रूपये भाव मिळत आहे. आंदोलन केल्यानंतरही सरकार केवळ मलमपट्टी करण्याचे धोरण अवलंबित आहे. केवळ घोषणांमुळे दुध उत्पादकांचे पोट भरणार नाही. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे तो रस्त्यावर उतरला आहे.

दुग्धविकास राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या कालच्या, शेतकरी दुधात पाणी टाकतात या वक्तव्याचा समाचार घेताना नागपुरच्या सरकारला शेतकऱ्यांचे दु:ख, वेदना समजत नाहीत. दुधातले पाणी कसे दिसते? असा प्रश्न विचारून शेतकऱ्यांच्या आंदोलनाची थट्टा करणाऱ्या मंत्र्यांचा समाचार घेतला. दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना एका दुध उत्पादक शेतकऱ्याने फोन केल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या 55 वर्षाच्या वडिलांना जेलमध्ये टाकण्याचा, चौकशी करण्याच्या कृतीचाही त्यांनी समाचार घेताना शेतकऱ्यांनी तुम्हाला जाबही विचारायचा नाही का, असा प्रश्न केला. 

दुधाला प्रतिलिटर 5 रूपये थेट अनुदान द्या, दूध भुकटी निर्यातीच्या अनुदानात दुप्पट वाढ करा, हे अनुदान दोन महिन्यांसाठी नव्हे तर सहा महिन्यांसाठी कायम ठेवण्याची मागणी त्यांनी केली.

इतर ताज्या घडामोडी
महाजनादेश यात्रेला बुधवारपासून नंदूरबार...नंदुरबार ः राज्यातील पूरस्थितीमुळे स्थगित झालेली...
पुणे बाजार समिती प्रशासकपदी वर्णी...पुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे...
प्रतिकूल हवामानामुळे जुन्नर तालुक्यातील...नारायणगाव, जि. पुणे  : दोन महिन्यांपासून...
नगर जिल्ह्यातील दहा ते अकरा तालुक्यांवर...नगर  ः राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाने...
पीक नुकसानीबाबत शेतकऱ्याने मांडली कृषी... कऱ्हाड, जि. सातारा ः घरात हुतं नव्हतं...
खानदेशात कापूस पिकात मर रोग, मूळकूजजळगाव ः खानदेशात जळगाव, धुळे व नंदुरबार...
...अन् नारायण राणे काँग्रेसमध्ये गेले...मुंबई  ः कोणताही अन्याय सहन करायचा नाही, या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात केळी, नारळ, सुपारी... सिंधुदुर्ग  ः कुणी तीन लाख तर कुणी दोन...
राष्ट्रपतींनी घेतला सूतकताईचा अनुभववर्धा  ः राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
पीएच.डी.साठी गुरुवारी सामाईक प्रवेश...पुणे ः  राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील...
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-... भंडारा  ः विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस...
कोयना धरणातून ६७ टीएमसी पाण्याचा विसर्गसातारा : या महिन्याच्या सुरवातीपासून मुसळधार...
मराठवाड्यात पाणीसाठ्याची स्थिती विदारकऔरंगाबाद : अर्धा पावसाळा लोटला तरीही मराठवाड्यात...
बुलडाणा जिल्ह्यात निर्माण झाली १३२५...बुलडाणाः जिल्हा प्रशासन व भारतीय जैन संघटना...
कोकणात नुकसानभरपाईचे वेगळे निकष लावा :...रत्नागिरी : ‘‘सांगली, कोल्हापूरप्रमाणेच कोकणातील...
सिंधुदुर्गात अतिवृष्टीने महावितरणचे चार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि...
शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर...जालना : सेंद्रिय शेतीमध्ये रासायनिक खतांचा...
परभणी जिल्ह्यात पाण्याअभावी फळबाग...परभणी : जिल्ह्यात गतवर्षीची दुष्काळी स्थिती आणि...
औरंगाबादेत कांदे १००० ते १६०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावच्या पश्‍चिम भागातील प्रकल्प कोरडेचजळगाव ः खानदेशात अनेक भागांत पाऊसमान चांगले असले...