अवकाळी नुकसानग्रस्तांना सर्वोतोपरी मदत करू : अजित पवार

Ajit Pawar
Ajit Pawar

मुंबई ः राज्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू असून मदतीचे आदेश देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (ता. २) दिली. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल याबाबत सभागृहात आणि मंत्रिमंडळात चर्चा होऊन निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.   दरम्यान, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. पिकांच्या ऐन मोसमात अवकाळी पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे. रविवारी सोलापूरसह मराठवाड्यातील काही भागांत अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे ज्वारीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तर नाशिकच्या नांदगावमध्येही अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागांत गारपीठही झाली आहे. त्यामुळे उघड्यावर असलेला कांदा भिजल्याने शेतकऱ्यांना नुकसानाचा सामना करावा लागणार आहे. तर, आज सकाळी पुन्हा लातूर, परभणीत पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. याचे पडसाद विधानसभेत पाहायला मिळाले. विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. तर, ऑक्टबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचे पैसे अजून दिले नाही. आता हे सरकार काय देणार? असा प्रश्न उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. ऑक्टोबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. त्यामुळे आता हे सरकार काय देणार? अशी टीका भाजपचे प्रदेक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली.  शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ः कृषिमंत्री शनिवार, रविवारी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे. काही ठिकाणी गारपीटही झाली. याचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्याची माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली. सोबतच शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील, असे आश्वासनही त्यांनी दिले. पंचनाम्याचा अहवाल आल्यावर नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com