agriculture news in Marathi government will procured extra milk Maharashtra | Agrowon

अतिरिक्त दूध शासन खरेदी करणार 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 एप्रिल 2020

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी १० लाख लीटर दूध २५ रुपये दराने खरेदी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

पुणे: राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी १० लाख लीटर दूध २५ रुपये दराने खरेदी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या योजनेतून खासगी दूध प्रकल्पांना वगळण्यात आले आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दुधाची खरेदी घटली आहे. अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांकडून पुढील दोन महिन्यांसाठी दररोज दहा लाख लीटर दूधाची २५ रुपये प्रतिलीटर दराने खरेदी करेल, असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. 

खासगी उद्योगांच्या म्हणण्यानुसार, ‘‘राज्यात रोज १२ लाख लीटर दूध अतिरिक्त ठरत असल्याचा सरकारचा अंदाज चुकीचा आहे. या दुधापैकी फक्त १० लाख लीटर दूध केवळ सहकारी दूधसंस्थांच्या माध्यमातून शासन २५ रुपये प्रतिलीटर दराने खरेदी करणार आहे. मुळात राज्यात ७८ टक्के दूध खरेदी खासगी प्रकल्प करीत आहेत. त्यामुळेच शेतकऱ्यांना दर मिळतो आहे’’ 

‘‘कोरोनाच्या स्थितीनंतर अतिरिक्त दूध ३५ लाख लिटरपेक्षाही पुढे आहे. खासगी व सहकारी संस्थांच्या पावडर प्रकल्पांमध्ये सध्या ६० लाख लिटरपेक्षाही जादा दुधावर प्रक्रिया केली जात आहे. त्यामुळे केवळ दहा लाख लीटर दूध जादा असल्याचे सांगून अनुदान योजना राबविणे चूक आहे,’’ असे खासगी प्रकल्पचालकांचे म्हणणे आहे. 

पावडर कोण आणि कुठे तयार करणार 
‘‘दहा लाख लीटर दुधाची भुकटी करुन ती साठवली जाईल. भुकटीची ऑनलाइन विक्री केली जाईल, असे राज्य शासन सांगत आहे. पण, महानंद किंवा आरेकडे इतक्या दुधाची पावडर करण्याची क्षमताच नाही. सहकारी संस्थांनाही त्यांच्याकडच्या दुधाची पावडर करता करता नाकी दम आलेला आहे. त्यामुळे सरकार या दुधाची पावडर कुठे करणार आहे,’’ असा सवाल पावडर प्रकल्पांकडून उपस्थित केला जात आहे. 
 


इतर अॅग्रो विशेष
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
सूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र...तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते...
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...
वऱ्हाडातील मोठे, मध्यम प्रकल्प तुडुंबअकोला ः वऱ्हाडात बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने...
मध्य महाराष्ट्र, कोकणात वादळी पावसाचा...पुणे ः महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर...
पावसाचा कहर, पिकांची नासाडी सुरुचपुणे ः राज्यात पावसाचा जोर वाढतच आहे. रविवारी (ता...
सांगली : डाळिंब बागांचे ५० कोटींहून...सांगली ः डाळिंबाला अगोदर निसर्गाची साथ मिळाली...
`क्रॉपसॅप`मध्ये ३३ कोटींची कपात पुणे: कोविड १९ मुळे ग्रामीण भागात तयार झालेल्या...
पशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...
संरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...
बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार?शेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...