Agriculture news in Marathi Government's dry assurances to farmers | Agrowon

सरकारची शेतकऱ्यांना कोरडी आश्‍वासने : फडणवीस

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे ९० टक्के पंचनामे अपूर्ण आहेत. राज्य सरकार शेतकऱ्यांना केवळ कोरडी आश्वासने देत आहे. प्रसंगी कर्ज काढून मदत करता येते.परंतु सरकारची तशी नियत दिसत नाही. शेतकऱ्यांना तत्काळ थेट मदत दिली नाही तर रस्त्यावर उतरून सरकारशी संघर्ष करू, असा इशारा विधान सभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

जिंतूर, जि. परभणी, हिंगोली ः अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे ९० टक्के पंचनामे अपूर्ण आहेत. राज्य सरकार शेतकऱ्यांना केवळ कोरडी आश्वासने देत आहे. प्रसंगी कर्ज काढून मदत करता येते.परंतु सरकारची तशी नियत दिसत नाही. शेतकऱ्यांना तत्काळ थेट मदत दिली नाही तर रस्त्यावर उतरून सरकारशी संघर्ष करू, असा इशारा विधान सभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

श्री. फडणवीस अतिवृष्टीमुळे झालेल्या पीकनुकसाची पाहणी करण्यासाठी बुधवारी (ता. २१) परभणी, हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले होते. पाचेगाव (ता. जिंतूर) येथील शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर, पंकजा मुंडे, आमदार मेघना साकोरे बोर्डीकर, जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम आदी उपस्थित होते.

श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, या राज्य सरकारच्या काळात कुठेही संवेदनशीलता दिसत नाही. बॅंका कर्जभरण्यासाठी शेतकऱ्यांना नोटिसा पाठवीत आहेत. सरकारकडून शेतकऱ्यांच्या तत्काळ मदतीची अपेक्षा होती. परंतु अद्याप दहा टक्केही पंचनामे पूर्ण झाले नाहीत. काही अधिकारी शेतकऱ्यांशी मग्रुरीने वागत आहेत. विमा कंपन्यांकडून अडवणूक केली जात आहे. आर्थिक अडचणी सापडलेल्या शेतकऱ्यांना रब्बी पेरणीसाठी तत्काळ मदतीची गरज आहे ती देण्यास सरकारला भाग पाडू, असे आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिले.

श्री. फडणवीस यांनी हिंगोली जिल्ह्यातही पीक नुकसानीची पाहणी केली. यावेळी यावेळी माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी आमदार गजानन घुगे, रामराव वडकुते, राम नागरे, शरद पाटील, पांडुरंग पाटील, सीताताई नागरे, सुरजीतसिंग ठाकूर, प्रा.गजाननराव कुटे, बबन सोनुने, गणेश देशमुख आदी उपस्थित होते.

हिंगोलीतील शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता. २१) सकाळी हिंगोली जिल्ह्यातील आडगाव रंजेबुआ (ता. वसमत), जवळा बाजार, साळणा, माथा (ता. औंढानागनाथ) येथे भेटी देऊन अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांसोबत चर्चा करून व्यथा जाणून घेतल्या. माथा येथील शेतकरी लक्ष्मण कुटे यांच्या शेतातील उभ्या सोयाबीनची तर साळणा येथे शेतकरी आश्रुबा सांगळे यांच्या सोयाबीनची फडणवीस यांनी पाहणी केली.


इतर ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये ‘स्वाभिमानी’चा रात्रभर...नाशिक  : दिल्लीत गेल्या सात दिवसांपासून...
सोलापूर जिल्ह्यातील ६५८...सोलापूर : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ६५८...
कसमादेत बायोगॅस संयंत्र उभारण्यास पसंती देवळा, जि. नाशिक : मृत कोंबडी पक्षांची...
नांदेडमध्ये ‘पणन’कडून कापसाची २६ हजार...नांदेड : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
कृषी कायद्यांविरोधात जागरण आंदोलनपुणे ः केंद्र सरकारच्या नवीन कृषी आणि पणन...
परभणीत केंद्र सरकारविरुद्ध निदर्शनेपरभणी : शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याच्या...
निम्न दुधनाच्या दोन्ही कालव्यात पाणीपरतूर, जि. जालना ः ‘‘रब्बी हंगामातील...
औरंगाबादमध्ये `स्वाभिमानी’चे...औरंगाबाद : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’चा जागर सोलापूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी...
धुळे- नंदुरबार मतदारसंघात पटेलांपुढे...धुळे ः विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार...
आश्वासनानंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन...पुणे ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये...
साताऱ्यात स्वाभिमानी संघटनेचे रात्रभर...सातारा : कृषी विधेयकाविरोधात पंजाब आणि हरियाना...
सिंचनासाठी ‘वान’वरून जलवाहिनी उभारावीतेल्हारा, जि. अकोला ः शासनाने अगोदर सिंचनासाठी...
वहितीदारांना ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी...नांदेड : ‘‘शेती करताना विविध कारणांनी शेतकऱ्यांचा...
बीड जिल्ह्यात अडीच लाखांवर शेतकरी...बीड ः महाविकास आघाडी सरकारच्या महत्वकांक्षी...
काँग्रेसने ५८ वर्षांनी भेदला भाजपचा गडनागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघात ५८ वर्षांनी...
लाडांच्या घरात ५८ वर्षांनंतर आमदारकीसांगली : तास धरून काम करणाऱ्या हाडाच्या...
जमिनीची सुपीकता जपण्यासाठी जैवविविधतेचे...परभणी ः मातीची पर्यायाने शेत जमिनीची सजीवता,...
आघाडीने चारली भाजपला धूळपुणे ः महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढलेल्या...
रत्नागिरीत जमिनीमध्ये नत्र, स्फुरदचे...रत्नागिरी ः जिल्ह्यातील जांभ्या जमिनीत नत्रासह...