कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा आटापिटा

कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा आटापिटा सुरूच आहे. कांदा निर्यातबंदी, व्यापाऱ्यांवर दबावानंतर आता इराणकडून कांदा आयात केला आहे. मात्र, अगदी नगण्यस्वरुपाची असलेली ही कांदा आयात देशांतर्गत दरावर तसूभरही परिणाम करणारी नाही, असे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
Government's efforts to control onion prices
Government's efforts to control onion prices

मुंबई : कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा आटापिटा सुरूच आहे. कांदा निर्यातबंदी, व्यापाऱ्यांवर दबावानंतर आता इराणकडून कांदा आयात केला आहे. मात्र, अगदी नगण्यस्वरुपाची असलेली ही कांदा आयात देशांतर्गत दरावर तसूभरही परिणाम करणारी नाही, असे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. कांद्यांचे उत्पादनच घटल्याने आवक कमी होऊन दरात सुधारणा झाली आहे, ही वाढ नैसर्गिक असल्याने यास भारतात नव्या कांद्याची आवश्‍यक आवक जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत दरावर नियंत्रण मिळणे दुरापास्त असल्याचे अभ्यासकांनी सांगितले.

पावसामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात कांद्याची कमतरता भासत आहे. अशा स्थितीत कांद्याच्या दरात वाढ होत आहे. कांद्याचे वाढणारे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि बाजारातील मागणी पूर्ण करण्यासाठी परदेशातून कांदा आयात करण्यात येत आहे. सुमारे सहाशे टन कांदा सध्या जेएनपीटी बंदरात दाखल झाला आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी इराणमधून २५ टन कांद्याचा एक कंटेनर दाखल झाला. इराणमधील या कांद्याला ५० ते ६० रुपये प्रति किलोचा दर मिळाला. तर आपल्याकडील कांद्याला घाऊक बाजारात ६० ते ७५ रुपये प्रति किलोप्रमाणे दर मिळत आहे. कांद्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी परदेशातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आयात करण्यात येत आहे.

यंदा महाराष्ट्र आणि शेजारच्या आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांमध्येही कांद्याचे पीक चांगले आले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे हा कांदा व्यापाऱ्यांना विकता आला नाही. तो गोदामातच राहिला. त्यानंतर महाराष्ट्रात चक्रीवादळ आले आणि त्यापाठोपाठ झालेली अतिवृष्टी, मध्येच उकाडा, पाऊस असे विचित्र वातावरण निर्माण झाले. यामुळे कांद्याच्या तापमानात फरक पडला आणि हा साठवलेला कांदाही काही प्रमाणात खराब व्हायला लागला. त्याचबरोबर आता पावसामुळे कांद्याचे पीकही पाण्याखाली गेल्याने ऑक्टोबरमध्ये येणारा कांदा लांबणीवर पडला आहे. त्यामुळे बाजारात कांद्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असून, दर वाढायला सुरवात झाली आहे. त्यामुळे बाजारात कांद्याची टंचाई भासत असल्याने परदेशातून कांदा आयात करण्याची वेळ आली आहे.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून कांद्याचे दर अगदी खाली आले होते. चांगला कांदा १० रुपये किलोच्या घरात होता. मात्र, दोन महिन्यांपूर्वीपासून कांद्याच्या दरात वाढ होत गेली आणि १० रुपये किलो असणारा कांदा वाढत वाढत २० ते २५ रुपये किलोपर्यंत पोहचला. तर अलीकडच्या २० दिवसांत कांदा २० ते २५ रुपयांवरून ६० ते ६५ रुपये आणि आता तर ७० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे.

ग्राहकांची देशी कांद्यालाच पसंती बाजारात यापूर्वीही अनेकदा इजिप्त, अफगाणिस्तान, चीन, पाकिस्तानातून कांद्याची आयात करण्यात आली होती. सध्या परदेशातून कांद्याची आवक होत असली तरी ग्राहकांकडून मात्र देशी कांद्यालाच पसंती मिळत आहे. त्यामुळे देशी कांद्याला सध्या बाजारात ६० ते ७५ रुपये प्रति किलोचा भाव मिळत आहे. तर परदेशी कांदा ५० ते ६० रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. सोमवारी मुंबई बाजार समितीत देशी कांद्याच्या १०० गाड्यांची आवक झाली.

सध्या मागणी अधिक असताना आयात झालेल्या इराणच्या कांद्याची उपलब्धता पुरेशी नाही.त्यास भारतीय कांद्यासारखी चव नाही. त्यामुळे या कांद्याच्या बाबतीत गुणवत्तेचा व चवीचा प्रश्न आहे. भारतीय कांद्याची मागणी चवीवर आहे. मात्र, इराण, इराक व तुर्की या देशांतून अपवादात्मक परिस्थितीत कांदा आणला गेला. तरीही यास मागणी नसल्याचा अनुभव आहे. त्यामुळे फारसा फरक पडेल असे दिसत नाही. त्याचा अनुभव ग्राहकांची पसंदी नसल्याने सकारात्मक नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. बाजार पेठेवर परिणाम होईल, अशी परिस्थिती नाही. - नानासाहेब पाटील, संचालक-नाफेड, नवी दिल्ली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com