Agriculture news in Marathi, Government's move to relieve drought-free Marathwada: Fadnavis | Page 2 ||| Agrowon

मराठवाडा दुष्काळमुक्‍तीसाठी सरकारचे पाऊल ः फडणवीस

टीम अॅग्रोवन
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

औरंगाबाद : वॉटर ग्रिड, गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात समुद्रात वाहून जाणारे कोकणातील पाणी वळविण्यासाठी योजनेतून येत्या काळात मराठवाडा दुष्काळमुक्‍त करण्याच्या दृष्टीने केवळ संकल्प न करता त्या दिशेने पाऊल टाकल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनानिमित्त स्थानिक सिद्धार्थ उद्यानामधील स्मृतिस्तंभाजवळ मंगळवारी (ता. १७) आयोजित ध्वजारोहणानंतर ते बोलत होते. 

औरंगाबाद : वॉटर ग्रिड, गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात समुद्रात वाहून जाणारे कोकणातील पाणी वळविण्यासाठी योजनेतून येत्या काळात मराठवाडा दुष्काळमुक्‍त करण्याच्या दृष्टीने केवळ संकल्प न करता त्या दिशेने पाऊल टाकल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनानिमित्त स्थानिक सिद्धार्थ उद्यानामधील स्मृतिस्तंभाजवळ मंगळवारी (ता. १७) आयोजित ध्वजारोहणानंतर ते बोलत होते. 

मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘१७ सप्टेंबरला मराठवाड्याला मिळालेला मुक्‍तीचा दिवस व जम्मू काश्मीरमध्ये ३७० कलम हटविल्याचा दिवस स्वातंत्र्याची विलक्षण अनुभूती देणारे क्षण आहेत. मराठवाड्याला दुष्काळापासून मुक्‍ती देण्यासाठी मराठवाडा ग्रिडसारखा प्रकल्प, ज्यामध्ये मराठवाड्यातील सगळी धरणे ग्रिडने जोडली जाणार आहेत. त्यामध्ये ६४ हजार किलोमीटरची पाइपलाइन टाकून मराठवाड्याच्या प्रत्येक गावांत आणि शहरात पिण्याचे स्वच्छ पाणी वर्षाचे ३६५ दिवस पुरविले जाईल. यासाठी केवळ निर्णय घेऊन सरकार थांबले नाही, तर चार जिल्ह्यांच्या निविदाही सरकारने काढल्या आहेत. अजून चार जिल्ह्यांच्या निविदा काढल्या जाणार आहेत. २० हजार कोटी रुपये खर्चून होणाऱ्या या ग्रिडनंतर मराठवाड्यातील जनतेला कधीही पिण्याच्या पाण्याच्या दुष्काळाला सामोरे जावे लागणार नाही. औरंगाबाद शहरासाठी १६५० कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे. या योजनेमुळे पुढील किमान ५० वर्षे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न औरंगाबादला भासणार नाही. सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्याकरिता गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी आणण्याची योजना सरकारने हाती घेतली आहे. त्यामुळे शेतीला पाणी मिळून मराठवाडा ‘सुजलाम सुफलाम’ होण्यास मदत होईल. समृद्धी महामार्गामुळे उद्योगाचे मॅग्नेट तयार करतोय. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डीएमआयसीमध्ये देशातील पहिली इंटिग्रेटेड स्मार्ट इंडस्ट्रियल सिटीचे लोकार्पण केले. त्याचा दुसरा टप्पा हाती घेतला आहे. डीएमआयसी व समृद्धी महामार्गामुळे औरंगाबाद, जालन्यासह संपूर्ण मराठवाड्यात उद्योगाचे मॅग्नेट तयार होईल. त्यामुळे सर्वांना रोजगार तर मिळेलच; शिवाय देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देण्याचे काम मराठवाड्यातून होईल. येणारा काळ मराठवाड्याच्या विकासाचा काळ असेल,’’ असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

तत्पूर्वी सकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे सिद्धार्थ उद्यानात आगमन झाले. त्यानंतर त्यांनी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण केले. मुक्‍ती संग्रामातील हुतात्म्यांना मानवंदना दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. 

या वेळी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य सैनिक उच्चाधिकार समितीचे सदस्य सचिव विष्णुपंत धाबेकर, पालकमंत्री दिवाकर रावते, राज्यमंत्री अतुल सावे, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर, विभागीय आयुक्‍त सुनील केंद्रेकर आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिकांसह त्यांचे उत्तराधिकारी यांची उपस्थिती होती. 
 


इतर ताज्या घडामोडी
‘गिरणा’तील मृत मासळीची चौकशी करा :...नाशिक : ‘‘गिरणा धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा...
`भाताच्या पेंड्यासह आंदोलन करणार`सिंधुदुर्ग : ‘परतीच्या पावसाने जिल्ह्यातील हजारो...
सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा ५८ हजार...सोलापूर : गेल्या दोन दिवसात पावसाने काहीशी...
पंढरपूर तालुक्यात १६ हजार लोकांचे...सोलापूर : अतिवृष्टीमुळे उजनी व वीर धरणातून...
नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे...आळसंद, जि. सांगली : ‘‘परतीच्या पावसाने...
हातातोंडाशी आलेल्या डाळिंबावर पाणी सांगली ः साडेतीन एकरातील डाळिंबाचा शंभर रुपये...
कोकण, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात...महाराष्ट्रावरील हवेचे दाब आज आणि उद्या १००४...
सांगलीत २५ पूल पाण्याखालीसांगली : जिल्ह्यात चौथ्या दिवशी पावसाचा जोर...
कोल्हापूर जिल्ह्यात हजारो हेक्टर...कोल्हापूर : शहरासह गेल्या दोन दिवसांपासून सुरू...
सिंधुदुर्गात भातपिकांचे अतोनात नुकसानसिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हयात मुसळधार पाऊस...
सातारा जिल्ह्यात दीड हजार हेक्‍टर...सातारा : ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व...
पुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या...
अमरावतीत एक लाख हेक्‍टरवरील पिकांना फटकाअमरावती ः सप्टेंबरमधील संततधार पावसाचा फटका...
भंडारा जिल्ह्यात सर्वेक्षणात नुकसान...भंडारा : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या...
पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत ः...पुणे ः परतीचा पाऊस, वादळीवारा आणि अतिवृष्टीमुळे...
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची उघडीपरत्नागिरी : कोकणातील पावसाचा जोर ओसरला आहे....
केळी पीक निकषप्रश्‍नी सोमवारच्या...जळगाव ः हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत केळी...
रब्बीसाठी अनुदानित हरभरा बियाण्याचा...बुलडाणा ः यंदाच्या रब्बी हंगामासाठी आलेल्या...
खानदेशात शासकीय कापूस खरेदी नोंदणीला...जळगाव ः शासकीय कापूस खरेदी योजनेला चांगला...
पंचनामे होईपर्यंत शेतात पिके तशीच...सांगली ः जिल्ह्यात बुधवार आणि गुरुवारी २४ तासांत...