agriculture news in Marathi governor says women should become owner Maharashtra | Agrowon

महिलांनी मालक बनले पाहिजे ः राज्यपाल

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 जानेवारी 2020

मुंबई ः महालक्ष्मी सरस प्रदर्शनातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होत आहे. महिलांनीही आता बचत गटांच्या चळवळीत सहभागी होऊन आपला विकास साधला पाहिजे. महिलांनी केवळ नोकर म्हणून काम न करता मालक बनले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी (ता. १७) केले.

मुंबई ः महालक्ष्मी सरस प्रदर्शनातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होत आहे. महिलांनीही आता बचत गटांच्या चळवळीत सहभागी होऊन आपला विकास साधला पाहिजे. महिलांनी केवळ नोकर म्हणून काम न करता मालक बनले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी (ता. १७) केले.

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील एमएमआरडीए मैदानावर देशभरातील बचत गट आणि महिला कारागिरांच्या विविध उत्पादनांचे ‘महालक्ष्मी सरस प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे, त्याचे उद्‍घाटन राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती, राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार आदी मान्यवर उपस्थित होते. 

राज्यपाल म्हणाले, की बचत गटांच्या महिला मेहनतीने आणि प्रामाणिकपणे उत्पादनांची निर्मिती करतात. यापुढे कोणत्याही सरकारी कार्यक्रमात महिला बचत गटांनी तयार केलेली उत्पादने वापरण्यात यावीत अशा सूचना मी राज्य सरकारला देईन, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती म्हणाल्या, की महिला बचत गटांद्वारे उत्पादीत वस्तूंचा दर्जा चांगला असतो. कोणत्याही प्रकारची भेसळ किंवा फसवणूक त्यात नसते, त्यामुळे लोकही विश्‍वासाने या वस्तू खरेदी करतात. बचत गट चळवळीचे हे फार मोठे शक्तिस्थान आहे, असेही त्यांनी सांगितले.

राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, की राज्यातील बचत गटाची चळवळ ही देशात अग्रक्रमावर आणण्याचा आमचा ध्यास आहे. उमेद अभियानांतर्गत आतापर्यत ४ लाख २३ हजार बचत गटांची स्थापना झालेली असून, त्या माध्यमातून ४५ लाख कुटुंबे अभियानाशी जोडली आहेत. राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, की मुंबईतील महालक्ष्मी सरस प्रदर्शन दरवर्षी यशस्वी होत आहे. आता गावातील महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी तालुका आणि जिल्हास्तरावरही बाजारपेठ उपलब्ध कररून दिली जाईल. 

बचत गटांना विविध पुरस्कार
राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बचत गटांना विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. क्रांती स्वयंसाह्यता बचत गट (खोडशी, जि. सातारा), प्रज्ञाशिल स्वयंसाह्यता बचत गट (राहुलनगर, जि. औरंगाबाद), एकवीरा स्वयंसाह्यता बचत गट (सिंधीमेघे, जि. वर्धा), यक्षणी स्वयंसाह्यता बचत गट (माणगाव, जि. सिंधुदुर्ग), ओमसाई स्वयंसाह्यता बचत गट (पाडळदे, जि. धुळे), आदर्श स्वयंसाह्यता बचत गट (जामोद, जि. बुलडाणा) यांना विभागस्तरीय प्रथम पुरस्काराचे वितरण करण्यात आले. याशिवाय जिल्हास्तरीय विविध पुरस्कारांचेही राज्यपालांच्या हस्ते वितरण झाले.
 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात गोंधळलेले सरकार: देवेेंद्र...मुंबई ः दिशा ठरत नाही आणि त्यांना सूरही गवसत...
कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्य सरकारची...मुंबई : आजपासून (ता. २४) सुरू होणारे अर्थसंकल्पी...
अकरा लाख टन रिफाइंड पामतेल आयातीला...नवी दिल्ली: केंद्र सरकारने रिफाइंड पामतेलाची...
कर्जमाफी बिनकामाची, तकलादू : राजू...नगर: पंतप्रधान पीकविमा योजना सरकारी...
पूर्व विदर्भात पावसाचा अंदाजपुणे  : पावसासाठी पोषक हवामान असल्याने पूर्व...
‘ठिबक’च्या ऑनलाइन अर्जासाठी मुदतवाढपुणे ः ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन...
विदर्भात पावसाची शक्यतापुणे: पूर्व आणि पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम होत...
सांगली जिल्ह्यातून सव्वादोन हजार टन...सांगली ः दुष्काळ, अवकाळी आणि अतिवृष्टीच्या...
शेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...
ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रायोगिक...सिल्लोड : हंगामनिहाय किती क्षेत्रावर कोणत्या...
अठ्ठेचाळीस कृषी महाविद्यालयांची...पुणे : विद्यार्थ्यांकडून लक्षावधी रुपये शुल्क...
सिंधुदुर्गच्या पूर्व पट्ट्यात आंब्याला...सिंधुदुर्ग: फेब्रुवारी महिना संपत आला तरी...
पशुधनाचे मार्चमध्ये होणार लसीकरणपुणे ः गाई, म्हशी, शेळ्या, कालवडी आजारी पडू नये...
निर्धारित निर्यातीनंतरच बफर स्टॉकवरील...नवी दिल्ली: देशातील ज्या साखर कारखान्यांनी...
खारपाण पट्ट्यातील येऊलखेड बनले कृषी...अकोला: विदर्भाची पंढरी शेगाव हे संपूर्ण...
जळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
इंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...
चांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...
सर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...
विदर्भात पावसाला पोषक हवामान पुणे: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...