बनावट कीडनाशकांची माहिती आता वेबसाइटवर

वेबसाइटवरून आम्ही शेतकऱ्यांना बाजारात उपलब्ध असलेला कीडनाशकांचा साठा, कीडनाशकाच्या उत्पादनाचे मूळ स्थान, स्रोत आणि क्लाऊडशी जोडलेल्या क्यूआर कोडची माहिती देणार आहोत. - एस. के. मल्होत्रा, केंद्रीय कृषी आयुक्त
pesticide
pesticide

नवी दिल्ली: बनावट कीडनाशक ओळखता येत नसल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असते. त्यामुळे शेतकऱ्यांना क्यूआर कोडच्या माध्यमातून बनावट कीडनाशक ओळखण्यास मदत व्हावी आणि साठा व्यवस्थापन साधनांची माहिती मिळावी यासाठी केंद्र सरकारने प्रायोगिक तत्त्वावर वेबसाइट (संकेतस्थळ) सुरू केले आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी आयुक्त एस. के. मल्होत्रा यांनी दिली.  शेतकरी पिकांचे नुकसान करणाऱ्या किंवा उत्पादनावर परिणाम करणाऱ्या बुरशी, तण आणि किडीचा बंदोबस्त करण्यासाठी कीडनाशकांचा वापर करतात. कीडनाशक उत्पादन आणि विक्रीची कोट्यवधीची बाजारपेठ देशभरात कार्यरत आहे. मात्र, देशभरात बनावट कीडनाशकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक देखील केली जाते.  बनावट कीडनाशकांविषयी माहिती नसल्यामुळे किंवा ओळखता येत नसल्याने शेतकरी बळी पडतात. शेतकऱ्यांना याविषयीची माहिती मिळण्यासाठी कोणतेही साधन आतापर्यंत उपलब्ध नव्हते, त्यामुळे पर्याय नव्हता. मात्र, केंद्र सरकारने प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या वेबसाईटवरून शेतकऱ्यांना आता बनावट किडनाशकांविषयीची माहिती मिळणार आहे. त्यामुळे फसवणूक टाळून शेतकऱ्यांना पिकांचे योग्य व्यवस्थान आणि उत्पादन वाढविण्यासाठी मदत होईल. ‘‘या वेबसाईटवरून शेतकऱ्यांना क्यूआर कोडच्या माध्यमातून बनावट किडनाशक ओळखण्यास मदत व्हावी आणि इतर साठा व्यवस्थापन साधनांची माहिती मिळणार आहे. या वेबसाईटवरून आम्ही शेतकऱ्यांना बाजारात उपलब्ध असलेल्या किडनाशकांच्या साठ्याविषयीची माहिती देणार आहोत. तसेच त्या किडनाशकाच्या उत्पादनाचे मूळ स्थान, स्रोत, क्लाऊटशी जोडलेल्या क्यूआर कोडची माहितीही वेबसाईटवर दिली जाणार आहे,’’ असे आयुक्त मल्होत्रा यांनी सांगितले.   ‘‘भारतात मोठ्या प्रमाणात बनावट किडनाशकांचे उत्पादन होते आणि त्याची विक्री होते. त्या माध्यमातून शेतकऱ्यांची लाखो रुपयांना फसवणूक होत असते. हे टाळण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या वेबसाईटचा फायदा होणार आहे,’’ अशी माहिती कृषी विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com