शेतीपूरक व्यवसायांना राज्य शासनाची पतहमी 

शेतीपूरक व्यवसायांना राज्य शासनाची पतहमी 
शेतीपूरक व्यवसायांना राज्य शासनाची पतहमी 

सांगली ः अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या शेतीपूरक व्यवसायासाठीच्या कर्जांना राज्य शासनाने पतहमी देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महामंडळाचे जिल्हा समन्वयक सर्जेराव पाटील यांनी दिली.  आतापर्यंत महामंडळाच्या योजनेचा लाभ ७ हजार ८६६ जणांना मिळाला असून, बॅंकेमार्फत ४०० कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. महामंडळांकडून ३ हजार ७०० लाभार्थींना १० कोटींचा व्याज परतावा केलेला आहे. उर्वरित लाभार्थींना व्याज परतावा देण्याचे काम सुरू आहे.  बॅंकामार्फत शेतीपूरक व्यवसायांकरिता कर्ज देताना अडचणी येत होत्या. त्या अडचणी दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राईजेसअंतर्गत शेतीपूरक कर्जाला पतहमी देता येते.  शेतीपूरक व्यवसायांसाठी केंद्र शासनाच्या मुद्रा योजनेच्या धर्तीवरच क्रेडिट गॅरंटी फंडस्‌ फॉर मायक्रो ॲण्ड स्मॉल एंटरप्रायजेस आणि क्रेडिट गॅरंटी फंडस्‌ ट्रस्ट फॉर मायक्रो ॲण्ड मीडिअम एंटरप्रायजेस या दोन्ही पत हमीच्या योजना यापुढील काळात महामंडळाच्या कर्जासाठी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महामंडळामार्फत सीजीटीएमएसई आणि सीजीएफएमयू या दोन्ही पतहमीच्या योजनांचे शुल्क बॅंकेत भरल्यावर त्याचा परतावा करण्यात येईल. या निर्णयानुसार राज्य शासनामार्फत बॅंकांना २५ सप्टेंबर २०१८ रोजी क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो ॲण्ड स्मॉल एंटरप्राईजेसअंतर्गत घेतलेल्या कर्जावरील पतहमी देण्याकरिता मंजुरी देण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com