agriculture news in Marathi, Govt. Credit guarantee for agriculture allied sector, Maharashtra | Agrowon

शेतीपूरक व्यवसायांना राज्य शासनाची पतहमी 
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

सांगली ः अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या शेतीपूरक व्यवसायासाठीच्या कर्जांना राज्य शासनाने पतहमी देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महामंडळाचे जिल्हा समन्वयक सर्जेराव पाटील यांनी दिली. 

आतापर्यंत महामंडळाच्या योजनेचा लाभ ७ हजार ८६६ जणांना मिळाला असून, बॅंकेमार्फत ४०० कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. महामंडळांकडून ३ हजार ७०० लाभार्थींना १० कोटींचा व्याज परतावा केलेला आहे. उर्वरित लाभार्थींना व्याज परतावा देण्याचे काम सुरू आहे. 

सांगली ः अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या शेतीपूरक व्यवसायासाठीच्या कर्जांना राज्य शासनाने पतहमी देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महामंडळाचे जिल्हा समन्वयक सर्जेराव पाटील यांनी दिली. 

आतापर्यंत महामंडळाच्या योजनेचा लाभ ७ हजार ८६६ जणांना मिळाला असून, बॅंकेमार्फत ४०० कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. महामंडळांकडून ३ हजार ७०० लाभार्थींना १० कोटींचा व्याज परतावा केलेला आहे. उर्वरित लाभार्थींना व्याज परतावा देण्याचे काम सुरू आहे. 

बॅंकामार्फत शेतीपूरक व्यवसायांकरिता कर्ज देताना अडचणी येत होत्या. त्या अडचणी दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राईजेसअंतर्गत शेतीपूरक कर्जाला पतहमी देता येते. 

शेतीपूरक व्यवसायांसाठी केंद्र शासनाच्या मुद्रा योजनेच्या धर्तीवरच क्रेडिट गॅरंटी फंडस्‌ फॉर मायक्रो ॲण्ड स्मॉल एंटरप्रायजेस आणि क्रेडिट गॅरंटी फंडस्‌ ट्रस्ट फॉर मायक्रो ॲण्ड मीडिअम एंटरप्रायजेस या दोन्ही पत हमीच्या योजना यापुढील काळात महामंडळाच्या कर्जासाठी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महामंडळामार्फत सीजीटीएमएसई आणि सीजीएफएमयू या दोन्ही पतहमीच्या योजनांचे शुल्क बॅंकेत भरल्यावर त्याचा परतावा करण्यात येईल. या निर्णयानुसार राज्य शासनामार्फत बॅंकांना २५ सप्टेंबर २०१८ रोजी क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो ॲण्ड स्मॉल एंटरप्राईजेसअंतर्गत घेतलेल्या कर्जावरील पतहमी देण्याकरिता मंजुरी देण्यात आली आहे.

इतर बातम्या
उद्योजकांच्या कर्जमाफीसाठी सरकारची मदत...अकलूज, जि. सोलापूर : ‘‘देशातील काही श्रीमंत...
फांगदर येथे वाचन प्रेरणा दिनानिमित्त...नाशिक : देवळा तालुक्यातील फांगदर येथील...
यवतमाळ जिल्ह्यात ओल्या दुष्काळानंतरही...यवतमाळ  ः भूजल सर्व्हेक्षण विभागाने केलेल्या...
बागलाण व देवळा तालुक्यांत बाजरी काढणीला...नाशिक : बागलाण व देवळा तालुक्यांत लष्करी...
परभणी जिल्ह्यात कृषी संजीवनींतर्गत २१...परभणी : जिल्ह्यात जागतिक बॅंकेच्या अर्थसहाय्याने...
हमीभावापेक्षा कमी दराने कापसाची खरेदीनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
उडीद, मूग, सोयाबीन ऑनलाइन नोंदणीला...औरंगाबाद: हमीदराने उडीद, मूग, सोयाबीन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सांगली : महापुरात खरीप पिकांचे मोठे नुकसान...
सांगली जिल्ह्यात डाळिंबावर रसशोषक...सांगली : मृग हंगाम धरलेल्या बहाराच्या डाळिंबाच्या...
बीड जिल्ह्यात हमीभाव शेतीमाल खरेदीची...बीड : हमीदराने शेतीमाल खरेदीच्या नोंदणीत...
कडधान्य आयातीला मुदतवाढीचा प्रस्तावनवी दिल्लीः देशात यंदा खरिप काडधान्य पिकांची...
भाजप सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या...बीड : आम्ही विविध भागात औद्योगिक वसाहती आणि...
पुणे जिल्ह्यातील ३१७६ हेक्टर क्षेत्राला...पुणे  ः जिल्ह्यात २५ सप्टेंबरला झालेल्या...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे: वाढलेल्या उन्हामुळे राज्यात चटका वाढला आहे...
परतीचा मॉन्सून आठ दिवसात माघारीपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
पुणे जिल्ह्यात होणार २३५४ पीककापणी...पुणे   ः पिकांची उत्पादकता आणि पीकविमा...
पुणे जिल्ह्यात लसीकरण पडताळणीसाठी...पुणे  : महाराष्ट्र राज्य लाळ खुरकूत रोगमुक्त...
नगर जिल्ह्यात बाराशे हेक्टरवर ज्वारी...नगर : कृषी विभागाच्या उन्नत शेती समृद्ध...
सातारा जिल्ह्यात पावसाची उघडीप; खरीप...सातारा  ः पावसाने उघडीप दिल्याने खरिपातील...
रविकांत तुपकर यांचा पुन्हा `स्वाभिमानी`...कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अंतर्गत...