agriculture news in Marathi govt with farmer Maharashtra | Agrowon

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री दादा भुसे

टीम अॅग्रोवन
रविवार, 27 सप्टेंबर 2020

 अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे राज्य शासनाने महसूल यंत्रणेस दिले आहेत. त्या प्रमाणे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन मदत देईल

कन्नड, जि. औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे राज्य शासनाने महसूल यंत्रणेस दिले आहेत. त्या प्रमाणे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन मदत देईल, असे कृषिमंत्री दादा भुसे यांनी शनिवारी (ता. 26) कन्नड येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत सांगितले. 

कृषिमंत्री भुसे यांनी नागद (ता. कन्नड) येथे प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करून थेट शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या अडचणी जाणून घेतल्या. मंत्री भुसे म्हणाले, की शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्यसरकार खंबीरपणे उभे आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे त्यांनी विमा कंपनीशी संपर्क साधावा. कन्नड तालुक्यातील कोविड सेंटरविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. 

या पत्रकार परिषदेस आ. उदयसिंग राजपूत, शिवसेना तालुका प्रमुख केतन काजे, उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश सातव, तहसीलदार संजय वारकड, विभागीय कृषी अधिकारी प्रभाकर चव्हाण, गटविकास अधिकारी कृष्णा वेणीकर, तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.लांजेवार, पोलीस निरीक्षक सुनील नेवसे, यांच्यासह डॉ. आण्णासाहेब शिंदे, शहरप्रमुख सुनील पवार, कपूरचंद राठोड, अतिक शेख, अरुण राठोड, प्रकाश पातळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. 

कृषिमंत्री श्री.भुसे यांनी नागद व कन्नड येथे कार्यकर्ते व नागरिकांचा सत्कार स्वीकारला नाही. सध्या शेतकऱ्यांवर संकट ओढवले असून, त्यांच्यावर आलेल्या संकटाची आपण पाहणी करत आहोत,अशा प्रसंगी फुले, हार, सत्कार स्वीकारणे योग्य नाही, असे सांगून त्यांनी सत्कार घेतला नाही. 

नियोजित मार्ग बदलला 
मंत्री श्री.भुसे यांचा मालेगावहुन चाळीसगाव मार्गे औरंगाबाद असा नियोजित दौरा होता. मात्र आमदार उदयसिंग राजपूत यांनी, कन्नड तालुक्यातील पिके अति पावसाने हातची गेली असून पाहणी करण्यासाठी नगद मार्गे जाण्याची विनंती केली. श्री.भुसे यांनी आपला नियोजित मार्ग बदलून कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. 
 


इतर अॅग्रो विशेष
पणन सुधारणा कायदे शेतकरी हिताचेच!शेतीमालाच्या मार्केटमध्ये दराच्या बाबतीत कधीही...
रिसोर्स बॅंक ः स्तुत्य उपक्रमहवामान बदलाच्या चरम सीमेवर आता आपण आहोत. खरे तर...
कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा...मुंबई : कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा...
‘बायोमिक्स’ विक्रीतून कृषी विद्यापीठाला...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
जरासं पहा ना साहेब, पाणीच पाणी वावरात...परभणी ः सदोष बियाण्यांमुळे दुबार, तिबार पेरणी...
परतीचा मॉन्सून राज्यातून चार दिवसांत...पुणे ः परतीच्या पाऊस सुरू असताना बंगालच्या...
कृषी कायद्यांविरोधात पंजाबकडून स्वतंत्र...चंडीगड : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन...
खारपाणपट्ट्यातील समस्यांवर...दापुरा (ता. जि. अकोला) येथील स्वप्नील व संदीप या...
सुर्डीतील तरुणांनी तेरा पाझर तलावांना...वैराग, जि. सोलापूर ः ‘वॉटर कप’ स्पर्धेत राज्यात...
कापूस विक्रीसाठी नोंदणी थांबविलीजळगाव ः शासकीय केंद्रात कापूस विक्रीसाठी बाजार...
प्रयोगशील दुग्ध व्यवसायातून पुढारले...माळीसागज (जि. औरंगाबाद) गावात कोरडवाहू क्षेत्र...
पाच हजार शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बॅंक’कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांवर सातत्याने...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा दणका पुणे ः राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोकणातही...
‘जीआय’प्राप्त शेतकरी ‘वापरकर्ते’ करणारपुणे: राज्यातील पिकांना भौगोलिक निर्देशांक मिळाले...
तीन दिवसांत मदतीबाबत निर्णय: मुख्यमंत्रीसोलापूर ः हवामान विभागाने आणखी दोन-तीन दिवस...
राज्यात पावसासाठी पोषक स्थिती पुणे ः बंगालचा उपसागर व दक्षिण आंध्रप्रदेश...
शेतकऱ्यांना मदतीसाठी कर्जाशिवाय गत्यंतर...तुळजापूर, जि. उस्मानाबाद: स्थानिक लोकांशी...
कोरोनामुळे वाढल्या कृषी व्यापार संधीचीनच्या तुलनेत आपली अर्थव्यवस्था मजबूत करायची...
कृषी ‘समृद्धी’चा मार्गबाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गालगत...
अकोले तालुक्यात होतेय डांगी गोवंशाचे...अकोले तालुक्यातील (जि. नगर) डोंगराळ, अति...