agriculture news in Marathi govt gave insurance to cane chopping labor Maharashtra | Agrowon

ऊसतोड मजुरांचा विमा सरकारने उतरवावा 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

 राज्यात सध्या कोरोना व्हायरस संसर्ग वाढत आहे. त्यात लवकरच साखर कारखाने सुरु होणार असल्याने मजुरांचे स्थलांतर होणार आहे.

नगर ः राज्यात सध्या कोरोना व्हायरस संसर्ग वाढत आहे. त्यात लवकरच साखर कारखाने सुरु होणार असल्याने मजुरांचे स्थलांतर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व ऊसतोड मजुरांचा विमा सरकारने उतरावा, अशी मागणी ऊसतोड कामगार संघटनाच्या प्रतिनिधींनी केली. ऊसतोडणी मजुरांच्या दरवाढ, अपघात विमा, निवासी आश्रम शाळांबाबतही चर्चा झाली. लवकर शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हस्तक्षेप करुन तोडगा काढण्यासाठी लवकर बैठक घ्यावी, असे अपेक्षा यावेळी व्यक्त केली. 

ऊसतोडणी मजुरांनी मजुरीत दरवाढ व अन्य मागण्यांसाठी ऊसतोडणी मजुरांच्या संघटनांनी संप पुकारला आहे. त्याबाबत गुरुवारी (ता.२४) साखर संघाच्या कार्यालयात साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासह संचालक मंडळांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक ऊसतोडणी मजूर संघटनांच्या प्रतिनिधींशी स्वतंत्र चर्चा करुन मते जाणून घेतली. सध्या कोरोना व्हायरस संसर्ग वाढत आहे. त्यात लवकरच साखर कारखाने सुरु होणार असल्याने मजुरांचे स्थलांतर होणार आहे. 

यावेळी साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, संचालक, महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी कामगार मुकादम युनियनचे चे अध्यक्ष गहीनीनाथ थोरे, श्रमिक संघटनेचे जीवन राठोड, माजी आमदार केशव आंधळे, प्रदीप भांगे, दत्तु भांगे, प्रा. सुशिला मोराळे, सुभाष जाधव आदींसह संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. लवकर शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हस्तक्षेप करुन तोडगा काढण्यासाठी लवकर बैठक घ्यावी, असे अपेक्षा यावेळी व्यक्त केली.

साखर संघाचा प्रस्ताव अमान्य
सामान्य परिस्थिती असलेल्या मजुरांना उपचाराची वेळ आली तर ते परवडणारे नाही. मजुरांनी २५ टक्के व सरकार आणि कारखाने प्रत्येकी ३७.५० टक्के विमा हप्ता भरतील, असे साखर संघाकडून सांगण्यात आले. मात्र, सर्व ऊसतोड मजुरांचा विमा सरकारने उतरावा, अशी मागणी ऊसतोड कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी केली. दरवाढ, विठ्ठलराव विखे पाटील अपघात विमा योजना, निवासी आश्रम शाळा याबाबींवर चर्चा झाली.


इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांनी केळी पीकविमा भरू नयेजळगाव ः हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत केळी...
सांगलीत रब्बीचा ३९ हजार हेक्टरवर पेरासांगली ः जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांची पेरणी...
मराठवाड्यात नुकसान भरपाईसाठी १७३४...औरंगाबाद : ‘‘मराठवाड्यातील पिकांच्या नुकसान...
रत्नागिरीतील पीक नुकसानीची भरपाई मिळेल...चिपळूण, जि. रत्नागिरी ः चिपळूण तालुक्यात मागील...
शितादही करण्यापुरताही कापूस लागला नाहीअकोला ः शेतकऱ्याने कपाशीची लागवड केली. कपाशीची...
परभणी जिल्ह्यात पीकविमा परताव्यासाठी ३१...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...
सीताफळ प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन...अकोला ः गेल्या काही वर्षात सीताफळ लागवडीकडे...
नगरमधील ६० गावांतील ७८ पाणी नमुने दूषितनगर ः जिल्ह्यातील १४ तालुक्‍यांतील सप्टेंबर...
पुणे कृषी महाविद्यालयात आंदोलनपुणे ः सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी महात्मा...
गोंदिया जिल्ह्यातील दोन संस्थांचा धान...गोंदिया : नियमबाह्यरीत्या धान खरेदी तसेच...
हिंगोली जिल्ह्यात तीन लाख ७ हजार...हिंगोली : जून ते ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टीमुळे...
उत्पादन खर्चाच्या दुप्पट दराचे काय? ः...नाशिक : ‘‘केंद्र सरकारने कांदा...
सोलापूर जिल्ह्यात पावणे दोन लाख हेक्‍टर...सोलापूर : अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यात...
सोलापुरात महावितरण मुख्यालयाला ‘...सोलापूर : लॉकडाऊन काळातील शेतीचे संपूर्ण वीज बिल...
सोलापूर जिल्ह्यात तीस हजार शेतीपंपाच्या...सोलापूर :  अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे...
सेंद्रीय आणि शाश्‍वत शेती विकासासाठी ‘...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या...
कांदाप्रश्नी केंद्राकडे पाठपुरावा करू:...नाशिक: कांदा साठवणूक मर्यादा निर्णयाच्या संदर्भात...
डाळिंबातील बुरशीजन्य मर रोगाचे...फळ तोडणीनंतर ताणावर असताना किंवा पिकाच्या...
केळी पिकावरील मर रोगाचे व्यवस्थापनझाडावरील जुन्या पानांच्या देठाकडील तळभागी फिकट...
सूक्ष्म अन्नद्रव्यांचे कार्यसूक्ष्म अन्नद्रव्यांचा योग्य प्रमाणात मातीतून आणि...