agriculture news in marathi Govt hikes Rabbi crop MSP for 2021_22 crop year | Page 2 ||| Agrowon

रब्बीचे हमीभाव जाहीर : गव्हात ४०; हरभरा १३०, मोहरीत ४०० रुपये वाढ

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 9 सप्टेंबर 2021

केंद्र सरकारने रबी हंगामासाठी अन्नधान्याचे किमान आधारभूत दर (एमएसपी) जाहीर केले आहेत.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने रबी हंगामासाठी अन्नधान्याचे किमान आधारभूत दर (एमएसपी) जाहीर केले आहेत. यासोबत, वस्त्र प्रावरणे उत्पादनाच्या आंतरराष्ट्रीय बाजारात भारताचे वर्चस्व वाढविण्यासाठी वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी १० हजार कोटी रुपयांची उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन योजना राबविण्याचाही निर्णय सरकारने घेतला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता. ८) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आर्थिक विषयक समितीने किमान आधारभूत किमती (एमएसपी) वाढीचा तसेच वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन योजनेचा (पीएलआय) निर्णय केला.

वस्त्रोद्योग आणि वस्त्रप्रावरणे उत्पादनात भारताचे वर्चस्व प्रामुख्याने सुती कापड या क्षेत्रात आहे. मात्र जागतिक बाजारपेठेत मानवनिर्मित (मॅन मेड) आणि टेक्निकल टेक्स्टाइलची हिस्सेदारी दोन तृतीयांश एवढी असल्याने या कापडांच्या उत्पादनात भारताचे वर्चस्व वाढविण्यासाठी आगामी पाच वर्षांत १०६८३ कोटी रुपयंची पीएलआय योजना राबविली जाणार असून, यामुळे साडेसात लाख लोकांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होईल असा दावा सरकारतर्फे करण्यात आला आहे. 

बैठकीनंतर वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी याबाबत सांगितले, की याअंतर्गत १०० कोटी रुपयांपर्यंत आणि ३०० कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांवर लक्ष केंद्रित केले जाणार असून, टीयर-३, टीयर-४ या शहरांमध्ये तसेच मागासलेल्या जिल्ह्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना विशेष सवलती दिल्या जातील. या योजनेचा लाभ प्रामुख्याने गुजरात, महाराष्ट्र, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, उत्तर प्रदेश, ओडिशा या राज्यांना होईल. 

दरम्यान,  २०२२-२३ च्या रब्बी पिकांची एमएसपी वाढविताना मसूर आणि मोहरी या पिकांत सर्वाधिक ४०० रुपये प्रतिक्विंटल, तर हरभऱ्यात  १३० तर गव्हात केवळ  ४० रूपये प्रतिक्विंटल वाढ केली आहे. करडईत ११४ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळी पिके लागवडीसाठी प्रोत्साहन मिळेल, असा दावाही सरकारतर्फे करण्यात आला आहे. 

जाहीर हमीभाव याप्रमाणे...(रुपये/प्रति क्विंटल)

पिके २०२१-२२  २०२२-२३ वाढ 
गहू १९७५   २०१५   ४० 
जव  १६००   १६३५   ३५
हरभरा   ५१००  `५२३० १३०
मसूर ५१०० ५५०० ४००
मोहरी ४६५० ५०५० ४०० 
करडई   ५३२७  ५४४१  ११४

 


इतर अॅग्रोमनी
‘महानंद’ला बदनाम करण्याचे प्रयत्न : ...मुंबई : कोरोनाची भयंकर परिस्थिती असताना ‘महानंद’...
‘एम’ अध्यक्षपदी राजकुमार धुरगुडे पाटील...पुणे ः देशपातळीवर कृषी निविष्ठा निर्मिती...
भारतात होणारी सोयापेंड निर्यात...पुणे : भारत सरकारने जणुकीय सुधारित सोयापेंड...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
खरिपात तेलबिया उत्पादनात घट होणारपुणे : खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये तेलबिया...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
देशभरात सोयाबीन ५५०० ते ७३००च्या दरम्यानपुणे : सध्या बाजारात येणाऱ्या सोयाबीनपैकी ज्या...
खाद्यतेल आयात शुल्क  कपातीचा ग्राहकांना...पुणे : केंद्र सरकारने देशांतर्गत वाढत्या...
तूर, उडीद आयात कालावधी वाढविल्याचा होईल...पुणे : केंद्र सरकारने तूर आणि उडीद आयातीसाठीचा...
हळद निर्यात ऑगस्टमध्ये ११ टक्क्यांनी...पुणे : देशात निर्यातयोग्य हळदीचा साठा उपलब्ध आहे...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
केंद्राच्या निर्य़ातीनंतर सोयाबीनच्या...पुणे : केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात कपात...
केंद्र सरकारकडून खाद्यतेल आयात शुल्कात...नवी दिल्ली ः देशात खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीवर...
वाढत्या मागणीने हरभरा दरात सुधारणापुणे : साठेबाज, व्यापारी आणि मिलर्सवर असलेली...
तूर, मूग, उडीद आयातीची प्रक्रिया सुरू;...पुणे : केंद्र सरकारने पंचवार्षिक करार करून...
रब्बीचे हमीभाव जाहीर : गव्हात ४०; हरभरा...नवी दिल्ली : केंद्र सरकारने रबी हंगामासाठी...
उडीद दरात सुधारणेची चिन्हेपुणे ः गेल्या हंगामात देशात उडदाचे उत्पादन कमी...
बेदाणा दरात प्रतिकिलो २५ ते ३० रुपयांची...सांगली : अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यामुळे...
जालन्यात रेशीम कोषाला उच्चांकी ५१...जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत...
साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करावी...नागपूर : एफआरपीत वाढ झाली असतानाच साखरेच्या...