agriculture news in Marathi, Govt. not gave lawyer for hiring, Maharashtra | Agrowon

बोगस बियाणे सुनावणीसाठी कृषी विभागाकडून वकीलच नाही

टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 फेब्रुवारी 2019

अमरावती  ः बोगस `बीटी` बियाणे प्रकरणात दाखल फौजदारी गुन्हा रद्द करावा, यासाठी कंपन्या उच्च न्यायालयात पोचल्या. परंतु कृषी विभागाने याप्रकरणात आपली बाजू मांडण्यासाठी वकिलाचीच नेमणूक केली नाही. यावरून बियाणे कंपन्यांसोबत कृषी विभागाचे लागेबंध असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. 

अमरावती  ः बोगस `बीटी` बियाणे प्रकरणात दाखल फौजदारी गुन्हा रद्द करावा, यासाठी कंपन्या उच्च न्यायालयात पोचल्या. परंतु कृषी विभागाने याप्रकरणात आपली बाजू मांडण्यासाठी वकिलाचीच नेमणूक केली नाही. यावरून बियाणे कंपन्यांसोबत कृषी विभागाचे लागेबंध असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. 

पूर्णानगर (ता. भातकुली) येथील शेतकऱ्यांच्या कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला होता. २०१७-१८ या वर्षातील हंगामात घडलेल्या या प्रकाराबाबत संबंधित बियाणे कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. कृषी विभाग त्यासाठी पुढाकार घेत नव्हता. परिणामी आमदार यशोमती ठाकूर यांनी विभागीय आयुक्‍तांची भेट घेत त्यांना आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर २७ नोव्हेंबर २०१७ रोजी आसेगाव पोलिस ठाण्यात कावेरी व अजित सिडस या दोन कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

दरम्यान, हा गुन्हा रद्द करावा यासाठी बियाणे कंपन्यांद्वारा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व भातकुली तालुका कृषी अधिकारी यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. परंतु, या प्रकरणात कृषी विभाग आणि शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी कृषी विभागाने पॅनलवरील एकाही विधीज्ञाची नेमणूक केली नाही. कंपन्यांचे हित जपण्यासाठी मुद्दाम हा प्रकार करण्यात आल्याचा आरोप त्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी केला आहे. 


इतर ताज्या घडामोडी
सार्वजनिक पैदास कार्यक्रमांचे प्रमाण...फळपिकातील नव्या जातींच्या पैदास कार्यक्रमांचे...
नगरमध्ये पीककर्ज वितरणात जिल्हा बॅंकच...नगर ः नगर जिल्ह्यात खरीप हंगामात आत्तापर्यंत खरीप...
`रानभाज्या खा, रोगप्रतिकार शक्ती वाढवा`सोलापूर : माहिती असलेल्या पालेभाज्या, फळभाज्या...
वेळीच ओळखा टोमॅटोमधील विकृतीभाजीपाला पिके ही अन्य पिकांच्या तुलनेत नाजूक...
गिरणा नदीवरील बलून बंधारे प्रकल्पाला...जळगाव  : केंद्र सरकारचा प्रायोगीक प्रकल्प...
परभणी जिल्ह्यात ऊस लागवडीत दुपटीने वाढपरभणी  ः जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये ३० हजार...
सहकारी साखर कारखान्यांनी रुग्णालय...कऱ्हाड, जि. सातारा : कोरोनाचे संकट हे अख्या जगावर...
शेतीच्या डेटा विज्ञानाबाबत जागृकतेची...परभणी :  डेटा विज्ञान तसेच कृत्रिम...
कृषी सल्ला (कोकण विभाग)हवामान अंदाज ः मुंबई येथील प्रादेशिक हवामान...
सांगलीत डाळिंब उत्पादक पीकविम्याच्या...सांगली : जिल्ह्यात पाच मंडळांत अतिपावसाने...
खानदेशातील अनेक भागात तुरळक पाऊसजळगाव  ः जिल्ह्यात रविवारी (ता.९) अनेक भागात...
रानभाज्यांकडे नागरिकांचा वाढता कलयवतमाळ : जिल्ह्याच्या डोंगररांगा व शेतशिवारात...
सातवा वेतन लागू करा, महागाई भत्ता द्या...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगरमध्ये आले चार ते पाच हजार रूपये...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
नगर जिल्ह्यात चार लाख टन कांदा चाळीतचनगरः गतवर्षी लेट खरीप, उन्हाळी कांद्याचे क्षेत्र...
नाशिकमध्ये लसणाची आवक साधारण; दरही...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
सोलापुरात ढोबळी मिरची, वांगी, काकडीला...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
मे ते जून दरम्यानचे वीज बिल माफ करा :...कोल्हापूर : मे ते जून दरम्यानचे वीज बिल माफ न...
पुणे बाजार समितीत व्यवहार सुरळीत...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
बुलडाण्यात २८२ शेतकऱ्यांनी राबवला रेशीम...बुलडाणा : जिल्ह्यात सन २०१५-१६ पासून सहकार व...