agriculture news in Marathi govt permission for tur moong and urad import Maharashtra | Agrowon

तूर, मूग, उडदाची आयात खुली 

विनोद इंगोले
सोमवार, 17 मे 2021

केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद आणि मुगाची आयात खुली केली आहे. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारातही कडधान्याचे दर तेजीत आहेत. 

नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद आणि मुगाची आयात खुली केली आहे. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारातही कडधान्याचे दर तेजीत आहेत. त्यातच आफ्रिकेमध्ये तूर उपलब्ध असली तरी म्यानमारमध्ये तुरीचा आणि उडदाचा कमी साठा आहे. परंतु नवीन माल बाजारात येण्यास खूप वेळ लागणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा दोन ते तीन महिन्यांपर्यंत दरावर परिणाम होईल, त्यानंतर दर पुन्हा सुधारतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. 

देशाच्या एकूण उत्पादनापैकी ३० टक्के उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते. तर देशाच्या आठ राज्यांमध्ये तूर घेतली जाते. त्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, तेलंगणा, आंध्र प्रदेश अशी क्रमवारी आहे. लागवड आणि उत्पादन अधिक असल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारच्या या धोरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 

केंद्र सरकारने शनिवारी (ता. १५) एका अधिसूचनेद्वारे तूर, मूग आणि उडीद यावरील आयात निर्बंध हटविण्याचे जाहीर केले. त्यामुळे आता ३१ ऑक्‍टोबर २०२१ पर्यंत कोणत्याही निर्बंधाविना आयात करता येणार आहे. त्याकरिता कोणत्याही प्रकारची मर्यादा असणार नाही. सीमा शुल्क विभागाला आयाती करता ३१ नोव्हेंबर २०२१ पर्यंत क्लिअरन्स देता येणार आहे. मात्र केंद्राच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना फटका बसणार असल्याचे जाणकार सांगतात. 

गेल्या हंगामात तुरीला ६०००, मूग ७१९६, उडीद ६००० असा हमीभाव होता. या तीनही शेतीमालांनी हमीभावाचा टप्पा पार केला आहे. तूरडाळीचे दर देखील यामुळे बाजारात वाढले. त्यामुळे सामान्य ग्राहकांचा रोष होता. त्याचा फटका भविष्यात निवडणुकांना बसण्याची शक्यता पाहता केंद्र सरकारकडून तूर, मूग, उडदाच्या आयातीचा निर्णय घेण्यात आला असावा, अशी शक्यता देखील जाणकारांमधून व्यक्त करण्यात आली आहे. 

मुगाचे देशात तीन दशलक्ष हेक्‍टर क्षेत्र असून ओडिशा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगण, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश हे मुख्य उत्पादक राज्य आहेत. उडदाखाली मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक १६.५० लाख हेक्टर, उत्तर प्रदेश ७.०१ लाख आणि महाराष्ट्रात २.८७ लाख हेक्टर क्षेत्र आहे. 

देशनिहाय तुरीखालील क्षेत्र (हेक्टर) 
भारत :
३.६ दशलक्ष 
म्यानमार : १५०.००० 
केनिया : १९६.०० 
चीन : १५०.००० 
मलावी : १२३.००० 
उगांडा : ८६.००० 
मोझँबिक : ८४.००० 
तांझनिया : ६८.००० 
नेपाळ : २१.००० 

प्रतिक्रिया 
हंगाम संपल्यानंतर आयात करत असल्याचा दावा केंद्र सरकार करीत आहे. मात्र बुकिंग केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत हा माल नोव्हेंबरपर्यंत देशात यावा असे निर्देश सीमाशुल्क विभागाला देण्यात आले आहेत. याच वेळी शेतकऱ्यांची तूर काढणी, मळणी होऊन बाजारात येते. हमीभावापेक्षा कमी किमतीत आयात झाली तर निश्चितच बाजार कोसळेल. त्यामुळे आयात शुल्क किती असेल आणि हमीभावापेक्षा कमी किमतीत आयात होणार नाही याची खबरदारी सरकारला घ्यावी लागेल. अन्यथा तूर, मूग, उडीद उत्पादकांना खर्चाची भरपाईदेखील अशक्य होईल. 
- विजय जावंधिया, शेती प्रश्‍नाचे अभ्यासक, नागपूर 

महाराष्ट्रात २५०० ते तीन हजार डाळ मिल असून, त्यातील सर्वाधिक अकोला आणि नागपूरमध्ये आहेत. सध्या या उद्योगाला पुरेशा प्रमाणात तुरीचा म्हणजेच कच्च्या मालाचा पुरवठा होत आहे. केंद्र सरकारने आयातीला परवानगी दिल्याने निश्‍चितच कच्च्या मालाचे दर खाली येतील. परिणामी, ग्राहकांना देखील तूरडाळ स्वस्त उपलब्ध होणार आहे. सध्या दर्जानुसार ९० ते ११० रुपये किलो प्रमाणे तूरडाळ बाजारात उपलब्ध आहे. प्रक्रिया उद्योजकांना ६५०० ते ७००० रुपये क्विंटल प्रमाणे उपलब्ध होत आहेत. केंद्र सरकारने भविष्यातील परिस्थिती पाहता आयातीचा निर्णय घेतला असेल. 
- मनोहर भोजवाणी, दाल मिल उद्योजक, नागपूर 

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असा दावा करणाऱ्या केंद्र सरकारने निविष्ठांच्या दरात दीड ते दोन पट वाढ करून कंपन्यांच्या उत्पन्नात घसघशीत वाढ करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांना उत्पन्नात की उत्पादनखर्चात वाढ करायची होती हेच आता कळत नाही. त्यातच आता हंगामापूर्वी आयातीचा निर्णय घेण्यात आल्याने शेती व्यवस्था उद्‌ध्वस्त करण्याचे हे षड्‌यंत्र आहे. 
- रामकृष्ण पाटील, कृषिभूषण शेतकरी, वांजरी, ता. केळापूर, जि. यवतमाळ 


इतर बातम्या
विदर्भात मुसळधारेची शक्यता पुणे : उत्तरेकडे मॉन्सून गेल्यानंतर राज्यातील...
दूधप्रश्‍नी शेतकरी आक्रमक; राज्यभरात...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
‘द्राक्ष क्लस्टर’मध्ये नाशिकचा समावेश नाशिक : केंद्र सरकारने देशभरात विविध ५३ पिकांचे...
सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजनेला गती...पुणे ः पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना...
विदर्भात अडीच कोटींचा ‘एचटीबीटी’ साठा...नागपूर : गेल्या हंगामात अनधिकृत कापूस बियाण्याचे...
वैयक्तिक वनदाव्यांचा जलदगतीने निपटारा...नाशिक : जिल्ह्यातील वैयक्तिक वनदाव्यांचा वनसमिती...
कोकणसह कोल्हापुरात पावसाने दाणादाण पुणे : कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड,...
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विम्याचे...सोलापूर ः राज्यातील फळबागांसाठी असलेल्या...
सिंधुदुर्ग पूरस्थितीच्या उंबरठ्यावरसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार...
कोल्हापुरातील शिवारे जलमयकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता. १६)...
खानदेशात अनेक भागांत पावसाची हजेरीजळगाव ः खानदेशात बुधवारी (ता. १६) अनेक भागांत...
दूध दरवाढीसाठी पुणे जिल्ह्यात निदर्शनेपुणे : लॉकडाउनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत...
खतांची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर...वाशीम : जिल्ह्यातील चार महसूल मंडळांचा अपवाद...
राज्यात २१८ तालुक्यांमध्ये दमदार पाऊस;...पुणे ः जूनच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यातील २१८...
राज्यात खरीप पेरणी तीन टक्केनगर ः राज्यात यंदा आतापर्यंत खरिपाची सरासरीच्या...
मराठा आरक्षणासाठी एकत्रित लढणारकोल्‍हापूर : इथून पुढील काळात कोणत्याही...
खानदेशात युरियाची टंचाईजळगाव : खानदेशात खरिपास हवी तशी सुरुवातदेखील...
दूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
खानदेशात कांदा दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात लाल कांद्याच्या दरात गेल्या चार-...
विदर्भात पावसाचा जोर वाढणारपुणे : राज्यातील बहुतांशी भागात उन्हासह अंशतः...