मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, केंद्र सरकारचे तीन नव्या कृषी कायद्यांना विरो
अॅग्रो विशेष
पामतेल आयात शुल्कात कपात; केंद्र सरकारचे पाऊल
केंद्र सरकारने कच्च्या पामतेलाच्या आयात शुल्कात १० टक्क्यांनी कपात केली आहे. त्यामुळे कच्च्या पामतेलावरील आयात शुल्क ३७.५ टक्क्यांवरून २७.५ टक्के झाले आहे.
नवी दिल्ली ः केंद्र सरकारने कच्च्या पामतेलाच्या आयात शुल्कात १० टक्क्यांनी कपात केली आहे. त्यामुळे कच्च्या पामतेलावरील आयात शुल्क ३७.५ टक्क्यांवरून २७.५ टक्के झाले आहे, अशी माहिती वाणिज्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून दिली.
देशातील एकूण वापर होत असलेल्या तेलात जवळपास ४० टक्के पामतेलाचा वाटा आहे. देशांतर्गत खाद्यतेलाचे दर वाढल्याने केंद्राने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. परंतु केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी यापूर्वी खाद्यतेल आयात शुल्कात कपात करण्याचा कोणताही विचार नसल्याचे म्हटले आहे. तसेच साल्व्हेंट एक्स्ट्राक्टर असोसिएशन आणि ‘सोपा’नेही खाद्यतेल आयात शुल्कात कपात करण्यास विरोध केला होता.
प्रतिक्रिया
केंद्र सरकारने कच्चे पामतेल आयात शुल्कात कपात करून ३७.५ टक्क्यांवरून २७.५ टक्के केले आहे. डॉलच्या तुलनेत विचार करता प्रतिटन आयात शुल्क ३४९ डॉलरवरून २५६ डॉलरवर आले आहे. तर रुपयाच्या तुलनेत विचार करता प्रतिटन २६ हजार २७० ते १९ हजार २७० रुपये शुल्क झाले आहे. टनामागे शुल्कात सात हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे.
- बी. व्ही. मेहता, कार्यकारी संचालक, सॉल्व्हेंट एक्स्ट्राक्टर असोसिएशन