agriculture news in Marathi govt should take loan for farmers help Maharashtra | Agrowon

शेतकऱ्यांना मदतीसाठी कर्जाशिवाय गत्यंतर नाही: शरद पवार

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

स्थानिक लोकांशी बोलल्यावर आणि प्रत्यक्षात पाहिल्यावर महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी असे आस्मानी संकट आले नव्हते.

तुळजापूर, जि. उस्मानाबाद: स्थानिक लोकांशी बोलल्यावर आणि प्रत्यक्षात पाहिल्यावर महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी असे आस्मानी संकट आले नव्हते. त्यामुळे या संकटातून लोकांना बाहेर काढण्यासाठी कर्ज काढण्याशिवाय गत्यंतर नाही. मुख्यमंत्र्यांशी बोलून कर्ज काढण्याची विनंती करणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिली. 

रविवार आणि सोमवार अतिवृष्टी झालेल्या मराठवाड्यातील गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली.  त्यानंतर शरद पवार यांनी रविवारी (ता.१९) सकाळी तुळजापूर सर्कीट हाऊसवर पत्रकार परिषद घेतली. ‘‘पीकविम्याचे जे निकष आहेत ते शिथिल करून मदत देण्यात यावी. पुरात सोयाबीन वाहून गेली आहे त्याचे पंचनामे करता येणार नाहीत, 

त्यामुळे ज्यांचे सोयाबीन वाहून गेलेल्या शेतकऱ्यांनासुद्धा नुकसान भरपाई देण्यासाठी नियमात तरतूद करण्यात यावी. त्या नियमात फेरविचार करण्याची मागणी करावी लागणार आहे. जमिनीची धूप झाली आहे. पाझर तलाव, व रस्त्यांचे नुकसान झाले आहे. या सगळ्यांसाठी जिल्हा नियोजनाचा निधी पुरेसा ठरणार नाही. त्यामुळे याला स्वतंत्र मदत देण्याचा निर्णय राज्य व केंद्र सरकारने घ्यावा,’’ अशी मागणी करणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. 

श्री. पवार म्हणाले, की उस्मानाबाद, लातूर, नांदेड, सोलापूर जिल्ह्याचा, पंढरपूर परिसराचा भाग या ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालेलं आहे. पुणे जिल्ह्याच्या इंदापूर भागात असंच चित्र आहे. उस्मानाबाद हा सबंध जिल्हाच संकटात असल्याचं दिसत आहे.

‘‘शरद पवार यांनी पाहणी केल्यानंतर सांगितले की, सोयाबीनचे पीक अतिवृष्टीमुळे कुजले, वाहून गेलंय किंवा उद्ध्वस्त झालंय. अतिवृष्टीचा परिणाम उसाच्या पिकावरही झाला आहे. या जिल्ह्यातली कारखानदारी जर लवकर सुरू झाली तर कदाचित काही उसाचा गळितासाठी विल्हेवाट लावण्यासाठी शक्य होणार आहे. म्हणून राज्य सरकारच्या सहकार खात्याशी कारखानदारी लवकर सुरू करता येईल का? याबाबत विचारणा करणार आहे,’’ असे शरद पवार यांनी सांगितले. 

शरद पवार म्हणाले...

  • जमीनच उद्ध्वस्त झाल्याने उभं राहणं सोपं 
  • शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदतीची गरज 
  • इंजिनं आणि पाइपलाइन्सही वाहून गेल्या
  • गावपातळीवरील रस्त्यांसाठी गुंतवणुकीची गरज 
  • विम्यासाठी ७२ तासांत नुकसानीचा फोटो अपलोड करणे सोप नाही. 
  • अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विमा नियमात शिथिलता देण्याची मागणी करणार 
  • लगेच मदत शक्य होत नाही, त्याची एक पध्दत असते
  • चौकटीच्या बाहेर पाऊस टाकल्याशिवाय लोकांना संकटातून बाहेर काढू शकत नाही.
     

इतर अॅग्रो विशेष
मूळ दुखण्यावर इलाज कधी?सरकार कितीही सांगत असले की आम्ही शेतकऱ्यांना...
‘सूक्ष्म उद्योग’ घडवतील मोठा बदल पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन...
केंद्र सरकारचा समितीचा प्रस्ताव...नवी दिल्ली : विज्ञान भवनात झालेली बैठक कोणत्याही...
यंदा हिवाळ्यात गारठा जरा अधिकच राहणारपुणे : चालू वर्षी डिसेंबर ते फेब्रुवारी या हिवाळा...
इथेनॉल प्रकल्प तारण घेऊन कारखान्यांना...पुणे : “राज्याच्या शेती व ग्रामीण अर्थकारणाला...
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ सक्रिय;...पुणे : बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या...
नव्या कायद्यामुळेच मिळाले पैसे;...धुळे : कृषी व पणन सुधारणा कायदा अस्तित्वात...
शेतकरी संघटनांचा उद्या राज्यव्यापी...नगर : केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या...
कापूस खरेदीतील कटती अयोग्य; सीसीआय...जळगाव : कापूस महामंडळ (सीसीआय) शेतकऱ्यांसाठी काम...
राज्यात ‘पणन’ची दहा हजार क्विंटल कापूस...नागपूर : राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी...
मराठवाड्यात कुठे मोहर, तर कुठे...औरंगाबाद : मराठवाड्यातील केसर आंब्याच्या झाडाला...
विविध तंत्रांचा वापर सांगणारी लंबे...बुलडाणा जिल्ह्यातील माळखेड येथील गणेश लंबे यांनी...
संवादातून मिटेल संघर्षकृषी व पणन सुधारणांबाबतच्या तीन नव्या...
हमीभाव ः वादीवाल्यांचा सापळालातूरला पुर्वी वादीवाले लुटारु टोळके असायचे. ते...
केंद्राचा चर्चेचा प्रस्ताव नाकारला;...नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या वतीने...
...येथे कांदा रोपे राखणीसाठी...विसापूर, जि. सातारा  : सोन्याचे दाग-दागिने,...
कृषी विभागात आगामी बदल्या समुपदेशनाने...पुणे : कोविड-१९ साथीमुळे कृषी विभागात यंदा...
बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या...पुणे :  निवार चक्रीवादळाचा प्रभाव निवळत...
कृषी पदव्युत्तर पदवीच्या प्रवेश...पुणे : राज्यातील चारही कृषी विद्यापीठाअंतर्गत...
सातत्य राखलेले पशुपालन ठरले शेतीलाही...यवतमाळ जिल्ह्यातील लोही (ता. दारव्हा) येथील...