वजनकाट्यात घोळ करून शेतकऱ्यांची फसवणूक  

कापूस खरेदीदरम्यान काट्यात घोळ करून शेतकऱ्यांची होत असलेली लूट करण्याचा प्रकार जाम येथील श्रीसुदर्शन कॉटन इंडस्ट्रीज येथे सुरू असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. या तक्रारीची दखल घेत पोलिस आणि वजनमापे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या काट्याची शहानिशा केली असता घोळ असल्याचे उघड झाले
वजनकाट्यात घोळ करून शेतकऱ्यांची फसवणूक  
वजनकाट्यात घोळ करून शेतकऱ्यांची फसवणूक  

समुद्रपूर, जि. वर्धा : कापूस खरेदीदरम्यान काट्यात घोळ करून शेतकऱ्यांची होत असलेली लूट करण्याचा प्रकार जाम येथील श्रीसुदर्शन कॉटन इंडस्ट्रीज येथे सुरू असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. या तक्रारीची दखल घेत पोलिस आणि वजनमापे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या काट्याची शहानिशा केली असता घोळ असल्याचे उघड झाले. यावरून या जिनिंगमधील काट्याला सील ठोकत जिनिंग मालकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. रेणकापूर येथील शेतकरी सचिन हिरामण शेंडे यांनी सुदर्शन कॉटन जिनिंगमध्ये कापसाची गाडी आणली. गाडीचे कपाशीसह वजन केले असता ३६ क्‍विंटल २५ किलो भरले. पण व्यापाऱ्याने दिलेला भाव न पटल्यामुळे त्यांनी कापूस गाडी थेट नजीकच्या श्रीवास कॉटन जिनिंगमध्ये नेली. येथे गाडीचे वजन केले असता ३६ क्विंटल ८५ किलो भरले. यात तब्बल ६० किलोचा घोळ असल्याचे पुढे आले. वजनामध्ये घोळ असल्याचा त्यांना संशय आला. आपल्यासारखी इतर शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून त्यांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली. शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून उपविभागीय पोलिस अधिकारी भीमराव टेळे, समुद्रपूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्यासह वैधमापनशास्त्र विभागाचे वरिष्ठ निरीक्षक शनी मोरे, निरीक्षक प्रदीप झोडापे, वर्धा विभागाचे कय्यूम शेख, हिंगणघाट विभागाचे निरीक्षक प्रशांत मेश्राम, सहायक निरीक्षक प्रकाश चव्हाण यांनी वजनकाट्याची तपासणी केली. यात चार टन वजनानंतर मर्यादेपेक्षा जास्त फरक आढळला. वजनकाट्यात त्रुटी आढळल्यामुळे सदर वजनकाट्याला वैधमापनशास्त्र अधिनियमन २००९ अंतर्गत सील करण्यात आले.  वजनात गफलत, भावात वाढ सुदर्शन कॉटन इंडस्ट्रीजमध्ये कापसाला इतर जिनिंगपेक्षा चांगला भाव मिळायचा. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कापूस विक्रीसाठी गर्दी असायची. पण वजनात गफलत करून भाव जास्त दिला जात असल्याचे या कारवाईमुळे लक्षात आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com