खरिपातील सोयाबीनचे शास्त्रज्ञांद्वारे जीपीएस मॅपिंग

खरिपातील सोयाबीनचे शास्त्रज्ञांद्वारे जीपीएस मॅपिंग
खरिपातील सोयाबीनचे शास्त्रज्ञांद्वारे जीपीएस मॅपिंग

अकोला  राज्यात यावर्षापासून कृषी उपक्रमांच्या डिजिटल देखरेखीसाठी महाअॅग्रिटेक प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत विविध पिकांचे शास्त्रज्ञांच्या मदतीने जीपीएस ट्रेकिंग केले जात आहे. सध्या सोयाबीन पिकाचे राज्यातील चार जिल्ह्यांत अशा स्वरूपाचे ट्रेकिंग होत असून, नुकतेच बुलडाणा जिल्ह्यात विविध तालुक्यात भेटी देत नोंद घेण्यात आली. डिजिटल पद्धतीने शेतीचा मागोवा घेणारा हा देशातील पहिला प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत पेरणीपासून काढणी, हवामान आणि पिकांवरील किडीवर उपग्रह आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल देखरेख केली जाईल. यामुळे लागवडीखालील क्षेत्राची पेरणीपासून काढणीपर्यंत उपग्रह देखरेखीचा उपयोग अचूक उत्पादनाचा अंदाज घेण्यासाठी केला जाईल. राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर (NRSC) चे शास्त्रज्ञ पी. श्रीकांत व चमूने बुलडाणा जिल्हयात मेहकर उपविभागातील तालुक्यांमध्ये भेटी दिल्या. सिंदखेडराजा तालुक्यात गोरेगाव येथील अविनाश पांचाळ यांच्या शेतातील जोड ओळ पद्धतीने कापूस व सोयाबीन पिकाची जीपीएलद्वारे नोंद केली. या वेळी मेहकरचे उपविभागीय अधिकारी नारायण देशमुख, तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड व शेतकरी उपस्थित होते.  महाअॅग्रिटेक या शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत भारत सरकारच्या अंतरिक्ष विभागाच्या माध्यमातून विदर्भातील बुलढाणा व मराठवाडयातील बीड, उस्मानाबाद, लातूर या भागात सोयाबीन क्षेत्राचे जीपीएस मॅपिंग केले जात आहे. या नोंदीमुळे भविष्यात अचूक क्षेत्र कळेल, शिवाय नियोजन, आखणी करण्यास वाव राहील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या उपक्रमांतर्गत सुमारे दीड कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणले जाणार आहे. 

बुलडाणा जिल्ह्यात येथे झाली पिकांची पाहणी  देऊळगावराजा तालुक्यातील भिवगाव, बोरखेडी, सिंदखेडराजा तालुक्यातील किनगावराजा, पिंपळगाव लेंडी, दुसरबीड, मलकापूर पांग्रा, शेंदुर्जन, गोरेगाव, मेहकर तालुक्यातील पांग्रीमाळी, लोणार तालुक्यातील सुलतानपूर, बीबी. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com