वाशीम जिल्ह्यावर खरिपात पावसाची कृपा

वाशीम जिल्ह्यात यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत चांगला पाऊस झाला आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमध्ये सार्वत्रिक स्वरूपात जोरदार पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी २६.६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
Grace of kharif rains on Washim district
Grace of kharif rains on Washim district

वाशीम ः जिल्ह्यात यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत चांगला पाऊस झाला आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमध्ये सार्वत्रिक स्वरूपात जोरदार पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी २६.६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातील पीकपरिस्थिती सध्या चांगली आहे.

वाशीम जिल्हा सोयाबीन पिकाचे आगार म्हणून ओळखले जाते. जिल्ह्याच्या चार लाख हेक्टर नियोजित क्षेत्रापैकी तीन लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड होत असते. यंदाही हे क्षेत्र लागवडी खाली आले आहे. पावसाच्या पहिल्या दीड महिन्यातच सरासरीच्या जवळपास ४० टक्के पाऊस झालेला आहे. सोमवारी सकाळी नोंद झालेल्या पावसात मालेगाव तालुक्यात सर्वाधिक ३४.८६ मिलिमीटर पाऊस झाला. तर कारंजामध्ये ११.६३ मिलिमीटर नोंद झाली.  

जिल्ह्यात सोयाबीननंतर कडधान्याचे ७४ हजार हेक्टर क्षेत्र आहे. यात प्रामुख्याने तुरीचे ५४ हजार हेक्टर क्षेत्र आहे. यंदा हे संपूर्ण क्षेत्र लागवडीखाली आलेले आहे. तर मूग, उडदाची १३ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. पेरणीनंतरच्या काळात पावसाने सातत्याने हजेरी दिल्याने पीक परिस्थिती तुलनेने चांगली आहे. सोयाबीन पिकाची जोमाने वाढ होताना दिसते आहे. या पिकातील आंतर मशागतीचे कामही वेगाने केले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com