उन्हाळ कांद्याच्या आवकेसह दरात हळूहळू सुधारणा 

जिल्ह्यात गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या दोन सुट्ट्यांनंतर बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव गुरुवारी (ता. १५) सुरू झाले. बाजारात लेट खरीप लाल कांद्याची आवक अजूनही टिकून आहे. यासह उन्हाळ कांद्याच्या आवकेसह दरात वाढ होत असल्याचे दिसून आले.
Gradual improvement in prices with the arrival of summer onions
Gradual improvement in prices with the arrival of summer onions

नाशिक : जिल्ह्यात गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या दोन सुट्ट्यांनंतर बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव गुरुवारी (ता. १५) सुरू झाले. बाजारात लेट खरीप लाल कांद्याची आवक अजूनही टिकून आहे. यासह उन्हाळ कांद्याच्या आवकेसह दरात वाढ होत असल्याचे दिसून आले. 

मार्चअखेर कांदा विक्री बंद राहिल्यानंतर जवळपास १० लाख क्विंटलहून अधिक कांदा विक्रीविना पडून राहिला. त्यामुळे जिल्ह्यात उच्चांकी आवक झाल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये उन्हाळ कांद्याच्या दरात किंचित वाढ होत असल्याचे या निमित्ताने पाहायला मिळाले. पिंपळगाव बसवंत येथे उन्हाळ कांद्याला उच्चांकी १३५१ प्रतिक्विंटल दर मिळाला. तर उमराने येथे लाल कांद्याला उच्चांकी ८५१ प्रतिक्विंटल दर मिळाला. 

जिल्ह्यात कळवण वगळता सर्वच बाजार आवारात लाल कांद्याची आवक टिकून आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घोषणा केलेल्या ‘रांगडा विकणार, उन्हाळ रोखणार’ या मोहिनेनुसार लाल कांदा बाजारात आणणे प्राधान्याने सुरूच आहे. जिल्ह्यात लाल कांद्याची लासलगाव, विंचूर उपबाजार आवार, उमराने, चांदवड, मनमाड, येवला, देवळा या भागांत आवक टिकून आहे. मात्र इतर बाजार समितीत उन्हाळ कांद्याची आवक अधिक आहे. उन्हाळ कांदा काढणी करून वजन मिळत असल्याने काही शेतकऱ्यांचा सध्या टप्प्याटप्प्याने विक्री करत असल्याचे दिसून येत आहे. 

जिल्ह्यातील गुरुवार (ता. १५) प्रतिक्विंटल दर स्थिती 
बाजार समिती लेट खरीप उन्हाळ कांदा
लासलगाव ८०१ १०२० 
पिंपळगाव बसवंत ८११ १३५१
उमराणे ८५० ९५० 
नामपूर ६०० ८०० 
देवळा ८०० ९५० 
चांदवड ८०० १०००
सटाणा ७२५ ८७५ 
येवला ७०० ८३० 
अभोणा (कळवण) - १००० 
सिन्नर ७०० ९५० 
नांदगाव ७५० ८०१ 
मनमाड ७२० ८०० 

सध्या सटाणा, देवळा, चांदवड, मालेगाव तालुक्यांतून उन्हाळी कांद्याची आवक वाढती आहे. तुलनेत लाल कांद्याची आवक कमी प्रमाणात आहे. मात्र उन्हाळ कांद्याच्या आवकेत वाढ होण्यासह दरात किंचित सुधारणा आहे.  - बाळासाहेब बाजारे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंपळगाव बसवंत 

ज्या शेतकऱ्यांना आर्थिक गरज ओळखून टप्प्याटप्प्याने विक्री करणे फायद्याचे ठरणार आहे. चांगल्या प्रतवारीचा टिकवणक्षमता असलेला कांदा साठवणूक करून ठेवणार आहोत. बाजारात आवक सर्वसाधारण राहील, असे नियोजन करण्यावर आमचा भर आहे.  - पंडित वाघ, कांदा उत्पादक, बार्डे, ता. कळवण 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com