Agriculture news in marathi Gradual improvement in prices with the arrival of summer onions | Page 2 ||| Agrowon

उन्हाळ कांद्याच्या आवकेसह दरात हळूहळू सुधारणा 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

जिल्ह्यात गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या दोन सुट्ट्यांनंतर बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव गुरुवारी (ता. १५) सुरू झाले. बाजारात लेट खरीप लाल कांद्याची आवक अजूनही टिकून आहे. यासह उन्हाळ कांद्याच्या आवकेसह दरात वाढ होत असल्याचे दिसून आले. 

नाशिक : जिल्ह्यात गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या दोन सुट्ट्यांनंतर बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव गुरुवारी (ता. १५) सुरू झाले. बाजारात लेट खरीप लाल कांद्याची आवक अजूनही टिकून आहे. यासह उन्हाळ कांद्याच्या आवकेसह दरात वाढ होत असल्याचे दिसून आले. 

मार्चअखेर कांदा विक्री बंद राहिल्यानंतर जवळपास १० लाख क्विंटलहून अधिक कांदा विक्रीविना पडून राहिला. त्यामुळे जिल्ह्यात उच्चांकी आवक झाल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये उन्हाळ कांद्याच्या दरात किंचित वाढ होत असल्याचे या निमित्ताने पाहायला मिळाले. पिंपळगाव बसवंत येथे उन्हाळ कांद्याला उच्चांकी १३५१ प्रतिक्विंटल दर मिळाला. तर उमराने येथे लाल कांद्याला उच्चांकी ८५१ प्रतिक्विंटल दर मिळाला. 

जिल्ह्यात कळवण वगळता सर्वच बाजार आवारात लाल कांद्याची आवक टिकून आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घोषणा केलेल्या ‘रांगडा विकणार, उन्हाळ रोखणार’ या मोहिनेनुसार लाल कांदा बाजारात आणणे प्राधान्याने सुरूच आहे. जिल्ह्यात लाल कांद्याची लासलगाव, विंचूर उपबाजार आवार, उमराने, चांदवड, मनमाड, येवला, देवळा या भागांत आवक टिकून आहे. मात्र इतर बाजार समितीत उन्हाळ कांद्याची आवक अधिक आहे. उन्हाळ कांदा काढणी करून वजन मिळत असल्याने काही शेतकऱ्यांचा सध्या टप्प्याटप्प्याने विक्री करत असल्याचे दिसून येत आहे. 

जिल्ह्यातील गुरुवार (ता. १५) प्रतिक्विंटल दर स्थिती 
बाजार समिती लेट खरीप उन्हाळ कांदा
लासलगाव ८०१ १०२० 
पिंपळगाव बसवंत ८११ १३५१
उमराणे ८५० ९५० 
नामपूर ६०० ८०० 
देवळा ८०० ९५० 
चांदवड ८०० १०००
सटाणा ७२५ ८७५ 
येवला ७०० ८३० 
अभोणा (कळवण) - १००० 
सिन्नर ७०० ९५० 
नांदगाव ७५० ८०१ 
मनमाड ७२० ८०० 

 

सध्या सटाणा, देवळा, चांदवड, मालेगाव तालुक्यांतून उन्हाळी कांद्याची आवक वाढती आहे. तुलनेत लाल कांद्याची आवक कमी प्रमाणात आहे. मात्र उन्हाळ कांद्याच्या आवकेत वाढ होण्यासह दरात किंचित सुधारणा आहे. 
- बाळासाहेब बाजारे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंपळगाव बसवंत 

ज्या शेतकऱ्यांना आर्थिक गरज ओळखून टप्प्याटप्प्याने विक्री करणे फायद्याचे ठरणार आहे. चांगल्या प्रतवारीचा टिकवणक्षमता असलेला कांदा साठवणूक करून ठेवणार आहोत. बाजारात आवक सर्वसाधारण राहील, असे नियोजन करण्यावर आमचा भर आहे. 
- पंडित वाघ, कांदा उत्पादक, बार्डे, ता. कळवण 


इतर बाजारभाव बातम्या
राज्यात टोमॅटो २५० ते २००० रुपयेजळगावात क्विंटलला १००० ते १६०० रुपये जळगाव...
नागपुरात सोयाबीनला हमीभावापेक्षा दुप्पट...नागपूर : सोयाबीन दरातील तेजी कायम आहे. कळमना...
नाशिकमध्ये गाजराच्या दरात क्विंटलमागे...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पुण्यात बहुतांश भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
राज्यात कांदा प्रतिक्विंटल ५०० ते २३००...अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते १६०० रुपये अकोला ः...
नगरमध्ये दोडका, वांगी, भेंडीच्या दरात...नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
नागपुरात सोयाबीन दरात तेजीनागपूर : सोयाबीन दरातील तेजी कायम असून कळमना...
चाकणच्या जनावरांच्या बाजारात ७० लाखांची...चाकण, जि. पुणे : येथील महात्मा फुले बाजार आवारात...
राज्यात जांभळांना ३००० ते १६००० रुपयेजळगावात क्विंटलला ६००० ते ९००० रुपये...
नाशिकमध्ये घेवड्याची आवक घटली; दरात...नाशिक : येथील बाजार समितीमध्ये गत सप्ताहात...
औरंगाबादमध्ये आंब्यांना सरासरी २४५० ते...औरंगाबाद : येथील बाजार समितीमध्ये आंब्यांचे...
पुण्यात भेंडी, गवारीच्या दरात सुधारणापुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
राज्यात लसूण ३५०० ते १२००० रुपयेपरभणीत क्विंटलला ५००० ते ६५०० रुपये परभणी...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक बाजार...
पुण्यात कांदा, बटाटा, घेवड्याच्या दरात...पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
राज्यात लिंबू ६०० ते ३००० रुपयेऔरंगाबादमध्ये क्विंटलला १२०० ते २००० रुपये...
नागपुरात सोयाबीनला ७४०० रुपयांचा दरनागपूर : कळमना बाजार समितीत सोयाबीनमधील तेजी कायम...
पुण्यात भाजीपाल्याच्या दरात १० ते २०...पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
राज्यात हिरवी मिरची १००० ते ३००० रुपयेजळगावात क्विंटलला १८०० ते २८०० रुपये...
सोलापुरात डाळिंबाच्या दरात तेजी टिकूनसोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात...