खानदेशात सणासुदीमुळे धान्याची आवक कमी, दरात सुधारणा

खानदेशात सणासुदीमुळे धान्याची आवक कमी, दरात सुधारणा
खानदेशात सणासुदीमुळे धान्याची आवक कमी, दरात सुधारणा

जळगाव : सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये धान्याची आवक व लिलाव फारसे झाले नाहीत. अमळनेर, चोपडा व शहादा बाजार समित्यांतही निम्मेच व्यवहार झाले. दरात मात्र किरकोळ सुधारणा झाली आहे.

रविवारपासून (ता. ४) दिवाळी सणास प्रारंभ होत आहे. या पार्श्‍वभूमीवर शनिवारी (ता. ३) लिलाव अधिक होतील, अशी अपेक्षा होती. परंतु फारसे लिलाव झाले नाहीत. भाजीपाल्याची तेवढी आवक जळगाव, पाचोरा, भुसावळ येथील बाजारात झाली.

धान्याची आवक या आठवड्यात कमी व्हायला सुरवात झाली. शनिवारी ज्वारी, सोयाबीन, उडदाची किरकोळ आवक जळगाव बाजार समितीत झाली. सोयाबीनचे दर ३१५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले. ज्वारीलाही २१५० रुपयांपर्यंतचे दर मिळाले. जळगाव बाजार समितीत ज्वारीची सुमारे ११५ क्विंटल, सोयाबीनची ५० क्विंटल आवक झाली. उडदाची किरकोळ आवक झाली. पाचोरा, अमळनेर व चोपडा येथील बाजारातही मिळून सुमारे ६०० क्विंटल ज्वारीची आवक झाली. सोयाबीनची आवक चोपडा व अमळनेर येथील बाजारात प्रत्येकी १०० क्विंटलवर झाली. शहादा येथील बाजारातही सोयाबीनच्या दरात किरकोळ सुधारणा झाली. तेथे सुमारे १२५ क्विंटल आवक झाली.

उपबाजारांत मक्याची आवक जामनेर, पाचोरा भागात मक्‍याची आवक अधिक झाली. जामनेरातील नेरी येथील बाजारात मक्‍याला १३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचे दर मिळाले. पाचोरा येथेही १२५० पेक्षा अधिक दर राहिले. दिवाळीनिमित्त बाजार समित्यांमधील व्यवहार जवळपास ठप्प राहण्याची शक्यता आहे., यामुळे मक्‍याची अधिकाधिक आवक जामनेर, पाचोरा भागात झाल्याची माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com