Agriculture News in Marathi On the grain, coarse grain purchase portal Second extension for registration | Agrowon

धान, भरडधान्य खरेदी पोर्टलवर  नोंदणीसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ 

टीम अॅग्रोवन
रविवार, 17 ऑक्टोबर 2021

पणन हंगाम २०२१-२२मध्ये विकेंद्रित धान व भरडधान्य योजनेअंतर्गत धान व भरडधान्य खरेदी पोर्टलवर शेतकऱ्यांची नोंदणी करण्याची मुदत ३० सप्टेंबर होती.

नाशिक : पणन हंगाम २०२१-२२मध्ये विकेंद्रित धान व भरडधान्य योजनेअंतर्गत धान व भरडधान्य खरेदी पोर्टलवर शेतकऱ्यांची नोंदणी करण्याची मुदत ३० सप्टेंबर होती. त्यानंतर पुन्हा ही मुदत १५ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्याबाबत नाशिक जिल्ह्यातील नामपूर बृहद्‌ विविध कार्यकारी सह.संस्थेने मागणी केली होती. तर पुन्हा दुसऱ्यांदा स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीनुसार अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने ही मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत पुन्हा वाढवली आहे. 

राज्यात पुरेशा प्रमाणात शेतकऱ्यांच्या नोंदी न झाल्याने शेतकरी किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत लाभ घेण्यापासून वंचित राहू शकतात. ही स्थानिक लोकप्रतिनिधींची मागणी विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सहसचिव सुधीर तुंगार यांनी या आशयाचे पत्र काढले आहे. मुदतवाढ देण्याबाबत महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशन व महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक यांना या बाबत सूचित करण्यात आले आहे. यापुढे मुदतवाढ देत येणार नसल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. 

खरीप पणन हंगाम २०२१-२२करिता शासनाने भरडधान्याचे हमीभाव हंगामासाठी निश्‍चित केले आहेत. ज्यामध्ये  मका १८७०, ज्वारी मालदांडी २७३८ व ज्वारी हायब्रीड २७५८, बाजरी २२५० व रागी ३३७७ रुपये प्रति क्विंटल असे जाहीर केलेले आहेत. नाव नोंदणीची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत शासनाने दिलेली आहे. जिल्ह्यात भरडधान्य खरेदीसाठी सब एजंट संस्थांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने मका, ज्वारी, बाजरी व रागी उत्पादक शेतकऱ्यांची नाव नोंदणी करावी, असे आवाहन माहिती नाशिक जिल्हा मार्केटिंग अधिकारी विवेक इंगळे यांनी केले आहे. 

 


इतर बातम्या
22 तारखेला कुठे होणार पाऊस?20 तारखेला दिवसभर राज्यातले हवामान कोरडे...
पंजाबात मोहरीच्या क्षेत्रात वाढ, मात्र...वृत्तसेवा - पंजाबमध्ये मोहरीची लागवड ३३ हजार...
लाळ्या खुरकूत साथीमुळे मलिग्रेत चार...आजरा, जि कोल्हापूर ः मलिग्रे पंचक्रोशीत लाळ्या...
वारणा साखर कारखान्याची निवडणूक...वारणानगर जि. कोल्हापूर : येथील श्री. तात्यासाहेब...
संपादित जमिनीला वाढीव मोबदला द्या अकोला : जिल्ह्यातील पारस येथील औष्णिक विद्युत...
ज्युनिअर आर. आर पाटलांनी कवठेमहांकाळचं...सांगली - संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या...
गडचिरोलीचे हत्ती गुजरातला नेण्याचा घाटगडचिरोली : जिल्ह्यातील सिरोंचा वनविभागातील अहेरी...
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
ईश्‍वेद समूहाच्या टिश्‍युकल्चर ...अकोला : सिंदखेडराजा येथील ईश्‍वेद बायोटेक टिश्‍...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...
चांदवडमध्ये कांदा लिलाव सुरूनाशिक : अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत...
पुणे विभागात रब्बीतील कांदा लागवडीत वाढपुणे : आगामी काळात कांद्याला चांगले दर...