Agriculture news in marathi, Grain at a discounted rate to poultry holders | Agrowon

पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य

टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

खानापूर तालुक्यातील दुष्काळी भागात मक्याचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. त्यामुळे कोंबड्यांना खाद्य तयार करता येईना. शासनाने धान्यावर अनुदान देऊन सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून देण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. त्यामुळे दुष्काळी पट्टयातील पोल्ट्रीधारकांना दिलासा मिळाला आहे. 
- शत्रुघ्न जाधव, पोल्ट्रीधारक, विटा

विटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना कोंबड्यांचे खाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या मका, तांदूळ, बाजरी व गहू या धान्यांना अनुदान देऊन हे धान्य सवलतीच्या दरात शासनाकडून दिले जाणार आहे. त्यासाठी सर्व पोल्ट्रीधारकांकडून धान्यांचे मागणी अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यामुळे पोल्ट्रीधारकांना दिलासा मिळाला आहे.

सध्या उपलब्ध असणारा कमी मका, वाढलेल्या दरामुळे अंडी उत्पादकांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. महाराष्ट्र राज्य लेअर पोल्ट्री अंडी उत्पादन संस्था व खानापूर तालुका कुक्कुटपालन सहकारी संस्थेने कोंबड्यांना खाद्य तयार करण्यासाठी शासनाला निवेदने दिली होती. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन आयुक्तालयाने जिल्ह्याच्या पशुसंवर्धन उपायुक्तांना सर्व पोल्ट्रीधारकांना मका, तांदूळ, बाजरी, गहू या धान्यांसाठी अर्ज करण्यासाठी कळविले आहे. 

धान्यांचा तुटवडा असणाऱ्या पोल्ट्रीधारकांनी जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त व तालुक्याच्या ठिकाणी पशुधन विकास अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करण्यास सुरवात केली आहे. शासनाकडून प्रत्येक पोल्ट्रीधारकाला चार ते पाच महिने पुरेल एवढा धान्याचा साठा मिळणार आहे. 


इतर ताज्या घडामोडी
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...
पोल्ट्री उद्योगाला हवा मदतीचा हातपुणे: बाजारभावातील नरमाईमुळे पोल्ट्री उद्योग...
हापूस निर्यातीसाठी निर्यातीसाठी पणन...रत्नागिरी ः निर्यातीत हापूसचा टक्का घसरत असून तो...
नीरा देवधर, गुंजवणीतून समन्यायी पाणीवाटपमुंबई ः नीरा देवघर व गुंजवणी धरणांचे कालवे...
तापमानवाढीचा धोका वेळीच ओळखावा लागेल:...औरंगाबाद: निसर्गाच्या दोलायमानतेत मानवी...
नगरमधील नऊ तालुक्यांत तेलबियांची पेरणीच...नगर ः तेलबियांची (गळीत धान्य) पेरणी वाढावी यासाठी...
सातारा जिल्ह्यात ५५ लाख क्विंटल...सातारा : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या गाळपाची...