agriculture news in Marathi grain distribution on discount rate to kesari ration card Maharashtra | Agrowon

केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्‍या दरात धान्‍य 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 एप्रिल 2020

मे व जून महिन्‍यांकरिता अंत्‍योदय अन्‍न योजना व अन्‍नसुरक्षा योजनेत समावेश नसलेल्‍या उर्वरित केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात धान्य देण्यात येणार आहे.

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी संपूर्ण टाळेबंदी करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर मे व जून महिन्‍यांकरिता अंत्‍योदय अन्‍न योजना व अन्‍नसुरक्षा योजनेत समावेश नसलेल्‍या उर्वरित केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात धान्य देण्यात येणार आहे. शनिवारपासून (ता.२५) रास्‍तभाव धान्‍य दुकानातून सवलतीच्‍या दरात धान्‍य वितरित करण्‍यात येणार आहे, अशी माहिती जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. 

शनिवारपासून (ता.२५) मे महिन्‍याचे धान्‍य दुकानातून उपलब्‍ध होणार करून देण्यात आले आहे. गहू ८ रुपये प्रति किलो, तांदूळ १२ रुपये प्रति किलो या दराने प्रति व्‍यक्‍ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ वितरित करण्‍यात येणार आहे. पुणे शहरात केशरी शिधापत्रिकांची संख्‍या सुमारे ४ लाख ६० हजार असून लाभार्थी संख्‍या सुमारे २० लाख आहे. पिंपरी-चिंचवडमध्‍ये हीच संख्‍या २ लाख ६५ हजार असून लाभार्थी संख्या सुमारे १० लाख इतकी आहे. मे महिन्‍याकरिताचा ३८८७ टन गहू व २५७२ टन तांदूळ स्‍वस्‍त धान्‍य दुकानामध्‍ये पोहोच करण्‍यात आलेला आहे. 

हे धान्‍य केवळ उर्वरित केशरी रेशनकार्ड धारकांनाच वाटप करण्‍यात येणार आहे. अंत्‍योदय व अन्‍नसुरक्षा लाभार्थ्‍यांना मे महिन्‍याचे धान्‍य वाटप ५ मे पासून करण्‍याचे नियोजन करण्‍यात आले आहे. रास्‍तभाव दुकाने पोलिसांच्‍या सूचनांप्रमाणे पूर्ण वेळ सुरु राहतील, दुकानांत उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेल्या धान्‍याचे वितरण लाभधारकांना ३१ मेपर्यंत करण्‍यात येणार असल्याने धान्‍य घेण्‍यासाठी गर्दी करु नये, रेशनकार्ड धारकांच्‍या तक्रार निवारणासाठी दूरध्‍वनी क्रमांक उपलब्‍ध करुन देण्‍यात आले आहेत. टोल फ्री क्रमांक १०७७, मदत केंद्र क्रमांक ०२०-२६१२३७४६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राम यांनी केले आहे. 

टोकन पद्धतीने धान्‍याचे वाटप 
केशरी कार्डधारकांना धान्‍य वाटप करण्‍यासाठी स्‍वस्‍त धान्‍य दुकानदारांनी निर्धारित वेळापत्रक तयार केले आहे. कार्डधारकांना टोकन पद्धतीने धान्‍याचे वाटप करण्‍यात येणार आहे. सर्वप्रथम सकाळी निर्धारित वेळेचे टोकन कार्डधारकांना वाटप करण्‍यात येईल. त्‍यानुसार दिलेल्‍या वेळेतच दुकानामध्‍ये जाऊन धान्‍य घ्‍यावे. लाभार्थ्‍यांनी धान्‍य घेताना सामाजिक अंतर ठेवावे आणि मास्‍कचा वापर करावा, असे आवाहन अन्‍न धान्‍य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांनी केले आहे. 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...