agriculture news in Marathi grain distribution to student Maharashtra | Agrowon

शाळांमध्ये शिल्लक धान्यांचे विद्यार्थ्यांना वाटप करणार

टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 मार्च 2020

जिल्ह्यातील वाडी वस्त्यांवर असलेल्या शाळांमध्ये पोषण आहार योजनेचे दोन ते तीन महिन्याचे धान्य शिल्लक आहे. शाळा बंद असल्याने हे धान्य खराब होण्याची भिती आहे. शिल्लक धान्य कोरोनावर उपायोजना करताना गरजू कुटुंबांना उपयोगी ठरणार आहे.
- रणजीत शिवतरे, उपाध्यक्ष जिल्हा परिषद 

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. मात्र या शाळांतील विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी खरेदी केलेले दोन ते तीन महिन्यांचे धान्य शिल्लक आहे. यापूर्वीच अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर शालेय पोषण आहारासाठीचे तांदूळ, डाळी, कडधान्याचे विद्यार्थ्यांना वितरीत करण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत.

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विनंती केली होती. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद आहेत. शाळांमध्ये दोन ते तीन महिन्यांचे धान्य शिल्लक असून ते खराब होण्यापेक्षा त्याचे वाटप करण्याची मागणी शिवतरे यांनी केली होती. त्यानंतर शासनाकडून तत्‍काळ याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

शाळेकडे शिल्लक असलेले धान्य मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थान समितीने विद्यार्थ्यांना व हंगामी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटप करावे, याची पुर्वकल्पना जिल्हाधिकारी आणि पोलिसांना कल्पना द्यावी, असे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी दिली आहे. 

असे होणार वाटप

  • आहार वाटपाचे शाळा व्यवस्थापन समितीला अधिकार
  • उपलब्ध धान्याची शाळा स्तरावरून प्रसिद्धी करावी
  • वाटप करताना गर्दी होणारी नाही याचे दक्षता घ्यावी
  • आजारी विद्यार्थ्यांना घरपोच आहार वाटपाच्या सुचना

 


इतर अॅग्रो विशेष
पावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...
मोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...
निर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...
पावसाचे धुमशान सुरुच पुणे   ः राज्यातील काही भागांत...
जळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...
यांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...
निम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
सूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र...तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते...
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...