बारदान्याअभावी धानाची खरेदी रामटेक केंद्रावर बंद

नागपूर ः रामटेक तालुक्‍यात फेडरेशनच्या माध्यमातून धान खरेदी केली जात आहे. महिनाभरापासून ही खरेदी सुरु आहे.
Grain for lack of bags Shopping closed at Ramtek Center
Grain for lack of bags Shopping closed at Ramtek Center

नागपूर ः रामटेक तालुक्‍यात फेडरेशनच्या माध्यमातून धान खरेदी केली जात आहे. महिनाभरापासून ही खरेदी सुरु आहे. चुकारे मात्र अद्यापही खात्यात जमा न झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शासनाने याची दखल घेऊन वेळीच चुकारे खात्यांत जमा करावे, अशी मागणी आहे. 

रामटेक येथील खरेदी विक्री सोसायटीमार्फत हमीभावाने धान खरेदी केली जात आहे. आतापर्यंत ३३६ शेतकऱ्यांकडून १६,६९९ क्‍विंटल धानाची खरेदी करण्यात आली. या धानाची किंमत ३ कोटी ११ लाख ९३ हजार ७३२ रुपये आहे. खासगी बाजारात हमीभावापेक्षा कमी दराने धानाची खरेदी केली जात आहे. त्यामुळे हमीभाव केंद्रांवर वाढती आवक असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

बारदाना व चुकाऱ्याचा अडसर खरेदीत असू नये, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले होते. मात्र, त्यानंतरही महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनकडून बारदान्याचा पुरवठा झाला नाही.

परिणामी, गेल्या तीन दिवसांपासून रामटेक येथील खरेदी बंद आहे. महिनाभरापासून खरेदी केलेल्या धानाचे चुकारे देखील जमा झाले नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. शासनाने या दोन्ही समस्यांवर तोडगा काढत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आहे. 

हमीभाव, बोनसमुळे वाढली आवक 

केंद्र सरकारने धानाला १८६८ रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. त्यासोबतच ७०० रुपये राज्य शासनाकडून बोनस दिला जातो. त्यामुळे धानाचे दर २५०० रुपयांपेक्षा अधिक झाले आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com