दुधी अळिंबी लागवडीसाठी जागेची निवड, वाढीसाठी लागणारे माध्यम आणि वातावरण तसेच काडाचे निर्ज
ताज्या घडामोडी
किनवट येथे धानाचे खरेदी केंद्र मंजूर
नांदेड : धान खरीप पणन हंगाम २०२० - २१ साठी किनवट तालुक्यातील अप्पाराव पेठ येथे धान खरेदी केंद्राला अटी व शर्तीनुसार मंजुरी देण्यात आली आहे.
नांदेड : धान खरीप पणन हंगाम २०२० - २१ साठी किनवट तालुक्यातील अप्पाराव पेठ येथे धान खरेदी केंद्राला अटी व शर्तीनुसार मंजुरी देण्यात आली आहे. धान खरीप पणन हंगाम एक ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत खरेदी करण्यात येईल.
आदिवासी क्षेत्रामध्ये भरडधान्य खरेदी करण्यासाठी नेमणूक केलेल्या अभिकर्ता संस्था महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित, नाशिक अंतर्गत प्रादेशिक व्यवस्थापक यवतमाळ यांनी प्रस्तावित केल्याप्रमाणे हे केंद्र मंजूर करण्यात आले.
यात कोविड -१९ चा प्रादुर्भाव रोखण्याचा दृष्टीने खरेदीच्या वेळी सर्व खरेदी केंद्रावर सुरक्षितरित्या खरेदी होण्यासाठी शारीरिक अंतर, निर्जंतुकीकरण इत्यादी बाबींचे पालन होणे आवश्यक आहे. यासाठी अभिकर्ता संस्थानी ४ मे २०२० अन्वये दिलेल्या सूचनांचे पालन करून सर्व खरेदी करण्याची दक्षता घ्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले.
प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया आदिवासी क्षेत्रासाठी महामंडळ नाशिक या अभिकर्ता संचामार्फत करावी, असेही निर्देशित आहे. धानाची खरेदी करताना संबंधित तालुक्यातील तहसिलदारांनी खरेदीच्या कालावधीत दर्जा नियंत्रण व दक्षता पथकांची स्थापना करावी, असे जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी सूचित केले.
- 1 of 1023
- ››