नांदेड जिल्ह्यात हमीभावाने ३८५७ क्विंटल शेतीमालाची खरेदी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नांदेड : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात ८६६ शेतकऱ्यांची ३३९६ क्विंटल तूर आणि ३७ शेतकऱ्यांचा ४६१ क्विंटल हरभरा असे एकूण ९०३ शेतकऱ्यांच्या ३८५७ क्विंटल शेतीमालाची हमीभावाने खरेदी करण्यात आली.

तुरीसाठी नाफेडच्या नांदेड येथील केंद्रावर १०५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. नायगाव येथे ८४, देगलूर येथे ११९, मुखेड येथे ४३३, भोकर येथे ५५, किनवट येथे ६३४ अशा एकूण १४३० शेतकऱ्यांनी नोंदणी केली. विदर्भ सहकारी विपणन महासंघाच्या धर्माबाद येथील केंद्रांवर २७१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. नाफेड आणि विदर्भ मार्केटिंग मिळून एकूण १७०१ शेतकऱ्यांनी तुरीसाठी नोंदणी केली.

त्यापैकी नाफेडच्या नांदेड येथील केंद्रावर ६८ शेतक-यांची २१७, नायगाव येथे १५ शेतकऱ्यांची ५२.५, मुखेड येथे २१९ शेतकऱ्यांची ९४३, किनवट येथे ३३३ शेतकऱ्यांची १ हजार ९४ क्विटंल अशी एकूण ६७० शेतकऱ्यांची २ हजार ३९५ क्विंटल आणि धर्माबाद येथील विदर्भ सहकारी महासंघाच्या केंद्रांवर १९६ शेतकऱ्यांची १ हजार ४ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.

हरभऱ्यासाठी नांदेड जिल्ह्यातील नाफेडच्या किनवट येथे ८४४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. नांदेड येथे १९, नायगाव येथे ७७, देगलूर येथे ११, भोकर येथील केंद्रांवर ७० शेतकऱ्यांनी अशा एकूण १ हजार २६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी केवळ किनवट येथील केंद्रांवर २८ शेतकऱ्यांचा ३२७ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आली. अन्य केंद्रांवर अद्याप खरेदी सुरू झाली नाही. धर्माबाद येथील विदर्भ सहकारी विपणन महासंघाच्या केंद्रावर ६१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ९ शेतकऱ्यांचा १३४ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com