परभणी, हिंगोली जिल्ह्यात हरभऱ्याचे साडेपाच कोटींचे चुकारे रखडले

परभणी : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत सन २०२०-२१ च्या हंगामात राज्य सहकारी पणन महासंघातर्फे परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १४ केंद्रांवर ९ हजार ८२४ शेतकऱ्यांचा १ लाख ३१ हजार ४८३ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे.
A gram of five and a half crore rupees stoped In Parbhani, Hingoli district
A gram of five and a half crore rupees stoped In Parbhani, Hingoli district

परभणी : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत सन २०२०-२१ च्या हंगामात राज्य सहकारी पणन महासंघातर्फे परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १४ केंद्रांवर ९ हजार ८२४ शेतकऱ्यांचा १ लाख ३१ हजार ४८३ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. मात्र, अद्याप ८९१ शेतकऱ्यांचे ११ हजार २६६ क्विंटल हरभऱ्याचे ५ कोटी ४९ लाख २१ हजार ७५० रुपयाचे चुकारे रखडले आहेत.

परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, बोरी, सेलू, पाथरी, सोनपेठ, पूर्णा या सात केंद्रांवर ४ हजार २६८ शेतकऱ्यांचा ५१ हजार १५४ क्विंटल आणि हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, जवळा बाजार, सेनगाव, साखरा ७ केंद्रांवर ५ हजार ५५६ शेतकऱ्यांचा ८० हजार ३२८ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. आजवर या दोन जिल्ह्यातील ८ हजार ९३३ शेतकऱ्यांना १ लाख २० हजार २१७ क्विंटल हरभऱ्याचे ५८ कोटी ६० लाख ६१ हजार २३८ रुपयाचे चुकारे अदा करण्यात आले.

काही केंद्रांवर हरभरा खरेदी करणाऱ्या संस्थांनी शेतकऱ्यांना कच्च्या पावत्या दिल्या. शेतकऱ्यांनी पक्क्या पावत्यांची मागणी केली. मात्र, त्या देण्यात आलेल्या नाहीत. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्याच्या तपशिलात चुका आहेत. असे सूत्रांनी सांगितले. हरभऱ्याची खरेदी पूर्ण होऊन मोठा कालावधी उलटला. परंतु, अद्याप परभणी, जिंतूर, सेलू, पाथरी, सोनपेठ, हिंगोली, कळमनुरी, वसमत, जवळा बाजार या १२ केंद्रांवरील ८९१ शेतकऱ्यांचे चुकारे अदा न केल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत.

केंद्रनिहाय चुकारे अदा स्थिती

केंद्र शेतकरी संख्या हरभरा क्विंटल  चुकारे रक्कम (कोटी रुपये)
परभणी ८९९ ११४१७ ५.५६५७
जिंतूर ३०४ ३३४९ १.६१२६
बोरी ४८५ ५९८८ २.९१९५
सेलू २६० ३००१ १.४६३२
पाथरी ८३२ १०२३३ ४.९८८६
सोनपेठ २८९ २९९८ १.४६१५२
हिंगोली १०९७ १७७८३ ८.६६९२
कळमनुरी  ११८४ १५८९८ ७.७५०६
वसमत  ३०६   ३५१८ १.७१५४
जवळा बाजार  १२२५ १४७८५ ७.२०२९
सेनगाव ८६८  १३९७९ ६.८१५०
साखरा  ६१५  १०१११ ४.९२९१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com