हरभरा उत्पादकांची शासकीय केंद्राकडे पाठ

शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत सहा एप्रिलपर्यंत सुमारे साडेसात हजार क्विंटल हरभरा विक्री केला. मात्र आता चुकाऱ्यास विलंब होत असल्याने तसेच बाजारात दर बरोबरीत असल्याने शेतकरी या केंद्राकडे पाठ फिरवत आहे.
हरभरा उत्पादकांची शासकीय केंद्राकडे पाठ Of gram growers Back to the Government Center
हरभरा उत्पादकांची शासकीय केंद्राकडे पाठ Of gram growers Back to the Government Center

संग्रामपूर, जि. बुलडाणा : शासनाने हमीभावाने हरभरा खरेदीसाठी केंद्र सुरू केले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत सहा एप्रिलपर्यंत सुमारे साडेसात हजार क्विंटल हरभरा विक्री केला. मात्र आता चुकाऱ्यास विलंब होत असल्याने तसेच बाजारात दर बरोबरीत असल्याने शेतकरी या केंद्राकडे पाठ फिरवत आहे. परिणामी येथील केंद्र ओस पडण्यासारखी स्थिती तयार झाली आहे.

शासनाने हमीभावाने खरेदीसाठी ९ मार्चपासून येथे केंद्र उघडले आहे. या केंद्रावर ३४३९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४१९ शेतकऱ्यांचा ७ हजार ५७४ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. या मालाची ३ कोटी ८६ लाख २८४२० रुपये एवढी रक्कम झालेली आहे. यंदाच्या खरेदीची २४ एप्रिलपर्यंत मुदत आहे. शासनाला विकलेल्या मालाचे पैसे महिना उलटला तरीही मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण होत आहे.

आता शेतकरी माल आणत नसल्याने मुदतीआधी केंद्र ओस पडण्याची चिन्हे तयार झाली आहेत. सध्या शासनाने लॉकडाउन सुरू केल्याने छोटे-मोठे उद्योग बंद झाले आहेत. शेतकऱ्यांचीही आर्थिक स्थिती चांगली नाही. शेतकऱ्यांकडे वीजबिल थकल्याने कनेक्शन कापणीचे संकट तयार झालेले आहे. अशा स्थितीत रब्बीत पिकविलेला हरभरा खासगी व्यापाऱ्यांना विकून जे मिळतील ते पैसे घेण्याची स्थिती शेतकऱ्यांची तयार झाली आहे.

प्रतिक्रिया

जिल्ह्यात आतापर्यंत ६४ हजार क्विंटल हरभरा झालेली आहे. बाजारात चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा हमीभाव खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांचा कल कमी दिसत आहे. जिल्ह्यात पणन विभागाच्या केंद्रावर सुमारे ३० कोटींची खरेदी झाली झाला. आतापर्यंत चार कोटींचे वाटप झाले आहेत. उर्वरित चुकारेही तातडीने केले जाणार आहेत.  -पी. एस. शिंगणे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, बुलडाणा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com