गहू, ज्वारीवर यंदा हरभऱ्याची सरशी

gram mustard this time on sorghum,  Wheat in Aurangabad, Jalna, Beed
gram mustard this time on sorghum, Wheat in Aurangabad, Jalna, Beed

बीड  : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ९१.३९ टक्‍के क्षेत्रावर पेरणी उरकली आहे. हरभऱ्याची सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत दीडपट क्षेत्रावर पेरणी झाली. गव्हाचीही सर्वसाधारण क्षेत्राची सरासरी ओलांडली आहे. त्यामुळे यंदा गहू, ज्वारीवर हरभऱ्याने सरशी केली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात यंदा रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ८ हजार १८८ हेक्‍टर होते. त्या तुलनेत १ लाख ६० हजार ७१५ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली. त्यामध्ये ज्वारीच्या झालेल्या ३५ हजार २५९ हेक्‍टरवरील पिकांसह गव्हाच्या ६० हजार ८१७ हेक्‍टर, मक्याची २१ हजार ६२ हेक्‍टर, हरभऱ्याची ४१ हजार ८३६ हेक्‍टर, करडईची ७२६ हेक्‍टर, मोहरी २३४ हेक्‍टर, जवस १२६ हेक्‍टर, सूर्यफूल ७ हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे. 

जालना जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ७४ हजार ३६८ हेक्‍टर होते. त्या तुलनेत २ लाख ३४ हजार ५७५ हेक्‍टरवर पेरणी झाली. त्यात ज्वारी ८९ हजार १७७ हेक्‍टर, गहू ५६ हजार २२९ हेक्‍टर, मका १२ हजार ५३१ हेक्‍टर, हरभरा ७६ हजार ११३ हेक्‍टर, जवस १० हेक्‍टर, तर सूर्यफुलाच्या ७ हेक्‍टर क्षेत्रासह इतर गळीत धान्य, कडधान्य व अन्नधान्याच्या क्षेत्राचा समावेश आहे. 

बीड जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र ४ लाख २२ हजार ७३० हेक्‍टर होते. प्रत्यक्षात ८० टक्‍के अर्थात ३ लाख ४० हजार ६४९ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. त्यात ज्वारीच्या १ लाख ७५ हजार ११७ हेक्‍टरसह गव्हाच्या ३० हजार ३६९ हेक्‍टर, मकाच्या २५१७ हेक्‍टर, हरभऱ्याच्या १ लाख ३१ हजार ८७६ हेक्‍टर, इतर कडधान्य २११ हेक्‍टर, करडई ३६४ हेक्‍टर, तर जवस १०७ हेक्‍टर आदी पिकांचा समावेश आहे. खरीप हातचा गेल्यानंतर आता रब्बीवरही संकटाचे ढग कायम असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. 

  • रब्बी पिकांवर संकटाचे ‘ढग’ कायम
  • गव्हानेही सरासरी क्षेत्र ओलांडले
  • जालना जिल्ह्यात १३४ टक्‍के पेरणी 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com