औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात एक लाख ४१ हजार हेक्‍टरवर हरभरा

Gram over one lakh 41 thousand hectares Aurangabad, Jalna, Beed district
Gram over one lakh 41 thousand hectares Aurangabad, Jalna, Beed district

बीड : यंदाच्या रब्बीत औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत हरभऱ्याची १ लाख ४१ हजार ६७१ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक पेरणी बीड जिल्ह्यात झाली. या जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेच्या पुढे ९५ हजार ५१२ हेक्‍टरवर हरभरा पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ५९ हजार ७१० हेक्‍टर इतके आहे. त्या तुलनेत तीनही जिल्ह्यात १ लाख ४१ हजार ६७१ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ८८ टक्‍के  क्षेत्रावर हरभरा आहे. यंदा ऑक्‍टोबरमधील पावसाने रब्बीची पेरणी लांबणीवर पडली. त्यामुळे बहुतांश पिकांचा पेरणीचा कालावधी हातचा निघून गेला. मक्यावर लष्करी अळीच्या आक्रमणाच्या भीतीने हरभऱ्याची पेरणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. शिवाय थंडीही अपेक्षेनुरूप नसल्याने रब्बीच्या अडचणी कायम आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यात हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ४५ हजार ९०२ हेक्‍टर होते. त्या तुलनेत ३९ टक्‍के अर्थात १८ हजार २८६ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. त्यामध्ये औरंगाबाद तालुक्‍यात १०३४ हेक्‍टर, पैठण १६००, फूलंब्री ४१९, वैजापूर २९०९, गंगापूर ५०८९, खुल्ताबाद २२८६, सिल्लोड २०५७, कन्नड २८४२, सोयगाव ५० हेक्‍टरवरील पेरणी झालेल्या हरभरा क्षेत्राचा समावेश आहे. जालना जिल्ह्यात हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ४२५१८ हेक्‍टर इतके आहे. त्या तुलनेत २७ हजार ८७३ हेक्‍टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com