गणपतीपुळे येथे ग्रामपंचायतीने साधला स्वच्छतेतून गरजूंच्या रोजगाराचा संगम

रत्नागिरी ः आंतरराष्ट्रीय पर्यटन असलेल्या गणपतीपुळे येथे कोरोनातील लॉकडाउनचा फटका अनेक स्टॉलधारकांना बसला. हातावर पोट असलेल्यांचा रोजगार बुडाला आणि कुटूंबाचा चरितार्थ कसा चालवायाचा हा प्रश्‍न उभा राहिला. त्यांच्या मदतीसाठी ग्रामपंचायत धावली. पावसाळ्यापुर्वीची कामे गावातीलच त्या गरजूंकडे सोपवत ग्रामपंचायतीने रोजगार आणि गावची स्वच्छता, असा दुहेरी संगम साधला.
The Gram Panchayat at Ganpatipule Confluence of employment of the needy through sanitation

सरपंच महेश ठावरे यांनी ही संकल्पना यशस्वीपणे राबवत आतापर्यंत १९ ग्रामस्थांना रोजगार दिला. लॉकडाउनमुळे पर्यटन स्थळे, समुद्रकिनारे येथे प्रवेशास बंदी करण्यात आली आहे. गणपतीपुळे पर्यटन स्थळ व संपूर्ण गावात अनेक छोटे, मोठे दुकानदार, स्टॉलचालक आहेत. लॉकडाउनमुळे व्यवसाय बंद झाले. त्यामुळे बेरोजगारीचे संकट निर्माण झाले. अनेकांच्या कुटूंबांची आर्थिक हेळसांड होत होती. ही बाब लक्षात घेत गणपतीपुळे ग्रामपंचायतीने गरजूंच्या हाताला काम देण्याचा निर्णय घेतला. 

पावसाळ्यापुर्वी गावातील वहाळ, नाले यांची साफसफाई करणे, रस्त्यांवर आजुबाजुला असणारी झाडी तोडणे, स्वच्छता करणे, गावातील स्मशानभुमीची स्वच्छता आणि लाकडे भरणे ही कामे केली जातात. त्यासाठी गावातील गरजू कामगारांना पर्याय ठेवला. गणपतीपुळेत सहा छोटे वहाळ आहेत. त्यांचा उगम डोंगरातून होतो.

पावसाळ्यापूर्वी ते साफ केले नाहीत, तर दगड-माती वहाळूतन रस्त्यावर येते. ही कामे त्या कामगारांमार्फत करण्यात आली. या काम वाटपात कोणावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्यात आली. सुरुवातीला नऊ गरजू लोकांना आठ दिवस काम दिले. त्यानंतर दुसऱ्या फळीत तयार झालेल्या दहा गरजूंना आठ दिवस काम दिले. प्रत्येकाला दिवसाला ५०० रुपयांप्रमाणे मजुरी निश्तिच केली होती. १९ दिवस हे काम सुरु होते. ही कामे करताना शारीरिक अंतर राखण्याच्या नियमाची काळजी त्यांनी घेतली. 

सरपंच ठावरे म्हणाले, ‘‘गावातील गरजूना घराजवळच काम देऊन उदरनिर्वाहाचे साधन पुरविले. ग्रामपंचायतींच्या बैठकीत निर्णय घेऊन त्याची यशस्वी अंमलबजावणीही केली. होणारा खर्च ग्रामनिधीतून दिली जाणार आहे. लॉकडाउनमध्ये रोजगार मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.’’    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com