ग्रामपंचायतींच्या वीजजोडण्या होणार पूर्ववत : मंत्री मुश्रीफ 

ग्रामपंचायतींच्या वीजजोडण्या न तोडण्याचा व तोडलेल्या वीजजोडण्या पूर्ववत जोडण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महावितरणला दिले आहेत, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
ग्रामपंचायतींच्या वीजजोडण्या  होणार पूर्ववत : मंत्री मुश्रीफ  Gram Panchayat power connections Will be undone: Minister Mushrif
ग्रामपंचायतींच्या वीजजोडण्या  होणार पूर्ववत : मंत्री मुश्रीफ  Gram Panchayat power connections Will be undone: Minister Mushrif

  कोल्हापूर : ग्रामपंचायतींच्या वीजजोडण्या न तोडण्याचा व तोडलेल्या वीजजोडण्या पूर्ववत जोडण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महावितरणला दिले आहेत, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.  वीजबिलांच्या थकीत वसुलीसाठी महावितरणने ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा व पथदिव्यांच्या वीजजोडण्या तोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे कारवाईही झाली होती. मंगळवारी (ता. २०) उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये बैठक झाली. बैठकीमध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, ऊर्जामंत्री नितीन राऊत, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह ग्रामविकास, ऊर्जा, वित्त व नियोजन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत हे आदेश दिले.  चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीमधून २०१९ मध्ये ५० टक्के थकबाकीपोटी महावितरणला ग्रामविकास विभागाने १,३७० कोटी रुपये अदा केले होते. ही रक्कम ग्रामपंचायतनिहाय जमा केलेली नसून, त्याचे ताळमेळ (रिकन्सिलेशन) पाहणे महत्त्वाचे आहे. त्या शिवाय ग्रामपंचायतींची थकबाकी व आकारणी बिनचूक होणार नाही, असे या वेळी सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com