Agriculture news in marathi Gram Panchayat power connections Will be undone: Minister Mushrif | Agrowon

ग्रामपंचायतींच्या वीजजोडण्या होणार पूर्ववत : मंत्री मुश्रीफ 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 जुलै 2021

ग्रामपंचायतींच्या वीजजोडण्या न तोडण्याचा व तोडलेल्या वीजजोडण्या पूर्ववत जोडण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महावितरणला दिले आहेत, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. 

 कोल्हापूर : ग्रामपंचायतींच्या वीजजोडण्या न तोडण्याचा व तोडलेल्या वीजजोडण्या पूर्ववत जोडण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महावितरणला दिले आहेत, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. 

वीजबिलांच्या थकीत वसुलीसाठी महावितरणने ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा व पथदिव्यांच्या वीजजोडण्या तोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे कारवाईही झाली होती. मंगळवारी (ता. २०) उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये बैठक झाली. बैठकीमध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, ऊर्जामंत्री नितीन राऊत, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह ग्रामविकास, ऊर्जा, वित्त व नियोजन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत हे आदेश दिले. 

चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीमधून २०१९ मध्ये ५० टक्के थकबाकीपोटी महावितरणला ग्रामविकास विभागाने १,३७० कोटी रुपये अदा केले होते. ही रक्कम ग्रामपंचायतनिहाय जमा केलेली नसून, त्याचे ताळमेळ (रिकन्सिलेशन) पाहणे महत्त्वाचे आहे. त्या शिवाय ग्रामपंचायतींची थकबाकी व आकारणी बिनचूक होणार नाही, असे या वेळी सांगण्यात आले.


इतर बातम्या
लातूरला सोयाबीन ९१४१ रुपये !लातूर ः येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न  ...
शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात चक्रिय...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...