Agriculture news in Marathi Gram Panchayat's initiative to curb the spread of 'corona' | Agrowon

‘कोरोना’चा फैलाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतींचा पुढाकार

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 20 मार्च 2020

पुणे ः जगभरात ‘कोरोना’चा फैलाव वाढत असून ग्रामीण भागात याला रोखण्यासाठी ग्रामपंचायतींनीदेखील पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील मंचर आणि नारायणगाव ग्रामपंचायतींनी विविध उपाययोजनांसह सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. 

मंचर ग्रामपंचायतीने गुरुवार (ता. १९) आणि शुक्रवारी (ता. २०) शहर बंद ठेवत स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणासाठी नागरिकांना प्रोत्साहन दिले आहे. 

पुणे ः जगभरात ‘कोरोना’चा फैलाव वाढत असून ग्रामीण भागात याला रोखण्यासाठी ग्रामपंचायतींनीदेखील पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील मंचर आणि नारायणगाव ग्रामपंचायतींनी विविध उपाययोजनांसह सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. 

मंचर ग्रामपंचायतीने गुरुवार (ता. १९) आणि शुक्रवारी (ता. २०) शहर बंद ठेवत स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणासाठी नागरिकांना प्रोत्साहन दिले आहे. 

याबाबत सांगताना सरपंच दत्ता गांजळे म्हणाले, ‘‘ग्रामपंचायतीद्वारे सार्वजनिक ठिकाणी फवारणी करण्यात येत आहे. नागरिकांनीदेखील आपला वैयक्तिक परिसर स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतीकडून औषध मोफत देण्यात येणार आहे. हे औषध घर व आजूबाजूचा परिसरात फवारावे. तसेच घरातील किंवा दुकानातील रोजच्या वापरात येणाऱ्या वस्तू  (उदा. टेबल, खुर्ची, कपाट, दरवाजे, कडी, कोयंडे, टी. व्ही, कॉम्पुटर आदी ) विविध प्रकारच्या वस्तू यांच्यावरही फवारणी करून घ्यावी. या औषधाचा मानवी शरीराशी संपर्क आल्यास घाबरून जाऊ नये. फक्त कपड्यावर औषध पडून देऊ नये याची काळजी घ्यावी. फवारणी करताना संपूर्ण अंग झाकले जाईल याची काळजी घ्यावी. 

शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतमधून औषध घेऊन जावे व आपल्या जवळील शेती पंपाने आपल्या घरा शेजारी व आजूबाजूला औषध फवारणी करावी. ग्रामपंचायत परिसर आणि वाड्या वस्त्यांवर कोरोना प्रतिबंधात्मक उच्च प्रतीची फवारणी करण्यात येत आहे. ही फवारणी प्रत्येक आठवड्यात एकदा करण्यात येत आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नारायणगावचे सरपंच बाबू पाटे म्हणाले,‘‘गावात गर्दी होऊ नये यासाठी १२ ते ५ वाजेपर्यंच व्यवहार अंशतः सुरू ठेवण्यात येणार आहे. तर सर्वसामान्य नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी सातत्याने हात धुण्यासाठी पाण्याच्या टाक्या आणि हॅन्डवॉशची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात नियमित फवारणी आणि स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.’’

थुंकल्यास तीन हजार दंड
मंचरमध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास तीन हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीने जाहीर केले आहे. दंड न भरल्यास संबंधिताच्या मालमत्तेवर बोजा चढविण्यात येणार आहे. तर थुंकणाऱ्याचे छायाचित्र टिपणाऱ्यास पाचशे रुपये बक्षीस ग्रामपंचायतीतर्फे जाहीर करण्यात आले आहे.


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...