ग्रामपंचायतीच्या सेवा ‘अत्यावश्यक’ म्हणून घोषित

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ग्रामीण भागात संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर ग्रामपंचायतींमार्फत देण्यात येणाऱ्या सर्व सेवा ‘अत्यावश्‍यक सेवा’ म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत ग्रामपंचायती सर्व दिवस नागरिकांच्या सेवेसाठी उघड्या ठेवण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.
Gram Panchayat's services declared as 'urgent'
Gram Panchayat's services declared as 'urgent'

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ग्रामीण भागात संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर ग्रामपंचायतींमार्फत देण्यात येणाऱ्या सर्व सेवा ‘अत्यावश्‍यक सेवा’ म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत ग्रामपंचायती सर्व दिवस नागरिकांच्या सेवेसाठी उघड्या ठेवण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.

पुण्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने त्यावर तत्काळ नियंत्रण मिळवणे आवश्‍यक आहे. ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रसार होऊ नये, याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. या पार्श्‍वभूमीवर ग्रामपंचायतींच्या सर्व सेवा ‘अत्यावश्‍यक सेवा’ म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतीमार्फत कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून जनजागृती करणे, स्वच्छता व साफसफाई करणे, शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे, आरोग्यविषयक सुविधा देणे आदी अत्यावश्‍यक सेवेच्या जबाबदाऱ्या ग्रामपंचायतीमार्फत पार पाडल्या जातात.    

यापुढे सर्व ग्रामपंचायती सर्व दिवस सुरू राहणार असून, ग्रामसेवक व सरपंच यांनी पूर्णवेळ ग्रामपंचायतीमध्ये हजर राहावे, गटविकास अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये. कोरोनाच्या संसर्गाबाबत आणि घ्यावयाच्या दक्षतेबाबत यापूर्वी दिलेल्या सूचनांची अमलबजावणी होईल, याची दक्षता घ्यावी. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात कोरोनाग्रस्त रुग्ण अथवा कोरोना सदृश लक्षणे असलेल्या व्यक्तीसंदर्भात कोणतही माहिती मिळाल्यास तत्काळ संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा परिषद कोरोना कक्ष येथे संपर्क साधावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

बॅंकांनी रोकड उपलब्ध ठेवावी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण भागातील बॅंकांनी शाखा, एटीएम आणि गावोगावी नेमलेल्या बॅंक प्रतिनिधीकडे (बॅंक करस्पाँडट्‍स) पुरेशी रोकड उपलब्ध ठेवावी, एटीमएम व शाखेमध्ये सोडिअम हायपोक्लोराइड वापरून निर्जंतुकीकरण करावे, पंतप्रधान जनधन योजनेच्या खातेधारकांना पाच हजारांचा ओव्हरड्राफ्ट उपलब्ध करून द्यावा, बॅंक प्रतिनिधींनी सॅनिटायझरचा नियमित वापर करावा, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामीण भागातील बॅंकांना दिले आहेत.

  • ग्रामपंचायती सर्व दिवस खुल्या राहणार
  • सरपंच, ग्रामसेवक ग्रामपंचायतीत थांबणार
  • कोरोना संशयितांची माहिती द्यावी लागणार
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com