Agriculture news in Marathi Gram Panchayat's services declared as 'urgent' | Page 2 ||| Agrowon

ग्रामपंचायतीच्या सेवा ‘अत्यावश्यक’ म्हणून घोषित

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 मार्च 2020

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ग्रामीण भागात संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर ग्रामपंचायतींमार्फत देण्यात येणाऱ्या सर्व सेवा ‘अत्यावश्‍यक सेवा’ म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत ग्रामपंचायती सर्व दिवस नागरिकांच्या सेवेसाठी उघड्या ठेवण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ग्रामीण भागात संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर ग्रामपंचायतींमार्फत देण्यात येणाऱ्या सर्व सेवा ‘अत्यावश्‍यक सेवा’ म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत ग्रामपंचायती सर्व दिवस नागरिकांच्या सेवेसाठी उघड्या ठेवण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.

पुण्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने त्यावर तत्काळ नियंत्रण मिळवणे आवश्‍यक आहे. ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रसार होऊ नये, याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. या पार्श्‍वभूमीवर ग्रामपंचायतींच्या सर्व सेवा ‘अत्यावश्‍यक सेवा’ म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतीमार्फत कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून जनजागृती करणे, स्वच्छता व साफसफाई करणे, शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे, आरोग्यविषयक सुविधा देणे आदी अत्यावश्‍यक सेवेच्या जबाबदाऱ्या ग्रामपंचायतीमार्फत पार पाडल्या जातात.    

यापुढे सर्व ग्रामपंचायती सर्व दिवस सुरू राहणार असून, ग्रामसेवक व सरपंच यांनी पूर्णवेळ ग्रामपंचायतीमध्ये हजर राहावे, गटविकास अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये. कोरोनाच्या संसर्गाबाबत आणि घ्यावयाच्या दक्षतेबाबत यापूर्वी दिलेल्या सूचनांची अमलबजावणी होईल, याची दक्षता घ्यावी. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात कोरोनाग्रस्त रुग्ण अथवा कोरोना सदृश लक्षणे असलेल्या व्यक्तीसंदर्भात कोणतही माहिती मिळाल्यास तत्काळ संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा परिषद कोरोना कक्ष येथे संपर्क साधावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

बॅंकांनी रोकड उपलब्ध ठेवावी
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण भागातील बॅंकांनी शाखा, एटीएम आणि गावोगावी नेमलेल्या बॅंक प्रतिनिधीकडे (बॅंक करस्पाँडट्‍स) पुरेशी रोकड उपलब्ध ठेवावी, एटीमएम व शाखेमध्ये सोडिअम हायपोक्लोराइड वापरून निर्जंतुकीकरण करावे, पंतप्रधान जनधन योजनेच्या खातेधारकांना पाच हजारांचा ओव्हरड्राफ्ट उपलब्ध करून द्यावा, बॅंक प्रतिनिधींनी सॅनिटायझरचा नियमित वापर करावा, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामीण भागातील बॅंकांना दिले आहेत.

  • ग्रामपंचायती सर्व दिवस खुल्या राहणार
  • सरपंच, ग्रामसेवक ग्रामपंचायतीत थांबणार
  • कोरोना संशयितांची माहिती द्यावी लागणार

इतर ताज्या घडामोडी
बुलडाणा जिल्ह्यात ‘कोरोना’ची वाढती...बुलडाणा ः जिल्ह्यात ‘कोरोना’बाधितांची संख्या नऊवर...
अकोला जिल्ह्यात नाफेडची खरेदी केंद्र...अकोला ः जिल्ह्यातील केंद्रावर नाफेडमार्फत हमी...
अकोला जिल्ह्यात अडचणीत शेतकरी शोधतायेत...अकोला ः अकोल्यात ‘कोरोना’बाधित रुग्णांची संख्या...
मुळा कालव्याचे पाणी अनेक गावांत पोचलेच...अमरापूर, जि.नगर  : मुळा उजव्या कालव्यातून...
पुणे जिल्हा प्रशासन कोरोनाबाबत...पुणे  : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
पुणे जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचा...पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सरकारने...
सह्याद्री सॅनिटायझर लवकरच बाजारपेठेतकऱ्हाड, जि. सातारा  ः ‘कोरोना’चा संसर्ग...
सातारा जिल्ह्यातील दूध उद्योगासह...कऱ्हाड, जि.सातारा ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
संजीवनी कारखान्याकडून प्रतिदिन ६० हजार...नगर  ः केंद्र सरकारच्या अन्न व औषध...
शेतीला दिवसा बारा तास वीज द्या : राजू...कोल्हापूर  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
आरोग्य क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांनी...मुंबई  :  कोरोना विरोधातील युद्धात...
द्राक्षबागेतील अवस्थांनुसार व्यवस्थापनसध्याच्या काळात बागेतील घडांच्या स्थितीनुसार...
कढीपत्त्याची व्यावसायिक लागवड फायदेशीरकढीपत्याचे शास्त्रीय नाव ‘मुर्रया कोइनिगी’ आहे....
दर्जेदार पशू खाद्य निर्मितीचे तंत्रजनावरांना शारीरिक व दूध उत्पादनासाठी लागणारे घटक...
माती परीक्षणानुसार द्या खतमात्रामाती परिक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतर जमिनीतील...
असे करा दर्जेदार चिकू उत्पादनाचे नियोजनचिकू फळांना योग्य दर मिळण्यासाठी योग्य आकार व...
सेनगाव, माकोडी कृषी बाजारात शेतमालाची...हिंगोली : ‘‘सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समिती,...
‘चांगभलं’च्या जयघोषाविना यंदा जोतिबाची...जोतिबा डोंगर, जि. कोल्हापूर ः कोरोना आणि...
नक्षलवाद्यांनीही घेतला कोरोनाचा धसका;...मुंबई : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत...
मुंबईत हापूसची आवक वाढली; ५ डझन पेटीस...मुंबई : वाहतुकीतील अडथळे दूर केल्याने मुंबई कृषी...