agriculture news in marathi, gram panchayats will get the building, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यातील २९२ ग्रामपंचायतींना मिळणार इमारती
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 1 जून 2018
जिल्ह्यातील भाडेतत्त्वावरील खोल्या, समाजमंदिर किंवा अन्य ठिकाणांहून कामकाज चालत असलेल्या व इमारती मोडकळीस आलेल्या २९२ ग्रामपंचायतींसाठी नव्या इमारती उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेकडून ४ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे, तसेच जिल्हा नियोजन मंडळ, शासकीय स्तरावरून मिळणाऱ्या निधीतून ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारती उभ्या राहणार आहेत.
- संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग.
पुणे : जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या किंवा भाडेतत्त्वावरील जागेत असलेल्या २९२ ग्रामपंचायत कार्यालयांना आता स्वत:च्या मालकीची इमारत उपलब्ध होणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून ग्रामपंचायत इमारतींची कामे केली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी दिली.
 
ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावातील विविध विकासकामे केली जातात. शासकीय योजना ग्रामस्थांपर्यंत पोचण्यास मदत होते, तसेच गावाच्या विविध नोंदी जतन केल्या जातात. पुणे जिल्ह्यात एकूण १४०७ ग्रामपंचायती आहेत. मात्र, त्यातील काही ग्रामपंचायतींना स्वत:च्या मालकीची जागा नाही. त्यामुळे गावातील एखाद्या भाडेतत्त्वावरील खोलीत किंवा समाजमंदिरात या ग्रामपंचायतींचे कामकाज चालवले जाते.
 
यातच काही ग्रामपंचायतींच्या इमारती मोडकळीस आल्या अाहेत. पावसाळ्यामध्ये पाणी गळण्यामुळे या ग्रामपंचायतींमधील कागदपत्रांचे नुकसान होते. अशा परिस्थितीत असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयांसाठी स्वतंत्र इमारत उभारण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.
 
एक हजारपेक्षा कमी लोकसंख्येच्या असलेल्या १४३ ग्रामपंचायती, दोन हजारपर्यंत लोकसंख्या असलेल्या १०० ग्रामपंचायती, तर दोन हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ४९ ग्रामपंचायत कार्यालयांसाठी नव्याने इमारती उभारण्यात येणार आहेत. यात भोर तालुक्‍यात सर्वाधिक ५८, खेड तालुक्यातील ४८, मावळमधील ३०, इंदापुरातील ३०, वेल्ह्यातील २९, जुन्नरमधील २२, पुरंदरमधील २२,  मुळशीतील २१, दौंडमधील १३, बारामतीतील ७, शिरूरमधील ६, हवेलीतील ४, तर आंबेगाव तालुक्यातील २ ग्रामपंचायती कार्यालयांसाठी नवीन इमारती उभारण्यात येणार आहेत.
 

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...