agriculture news in marathi, gram procurment and storage issue, jalgaon, maharashtra | Agrowon

जळगाव जिल्ह्यात गोदामे उपलब्ध नसल्याने हरभरा खरेदी रखडली
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 मार्च 2018
शासकीय हरभरा खरेदीची तयारी झाली आहे. आणखी एक खरेदी केंद्र मंजूर होईल, अशी अपेक्षा असून, १२ ठिकाणी खरेदी होईल. परंतु गोदामांची अडचण असल्याने खरेदीला सुरवात नाही. परंतु येत्या सोमवारपर्यंत (ता. २६) हरभरा खरेदी सुरू होईल. 
- परिमल साळुंखे, पणन अधिकारी, मार्केटिंग फेडरेशन
जळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदी रखडली असून, गोदामे उपलब्ध नसल्याने नव्याने खरेदीला ब्रेक लागला आहे. तूर खरेदीवरही याचा परिणाम होऊ लागला असून, जिल्ह्यात खरेदी केलेले धान्य नवापूर (जि. नंदुरबार) येथील गोदामांमध्ये ठेवण्याच्या हालचाली सुरू आहेत. 
 
हरभरा खरेदी येत्या सोमवारपासून सुरू होईल, असे संकेत आहेत. सोमवारपर्यंत खरेदी केलेली तूर, उडीद, मूग व इतर धान्य इतरत्र हलविले जाईल. जिल्ह्यात पारोळा व भडगाव वगळता सर्व १३ तालुक्‍यांमध्ये वखार महामंडळाची गोदामे आहेत.
 
या गोदामांमध्ये मागील वर्षी खरेदी केलेली तूर व इतर कडधान्य, सोयाबीन व मका पडून आहे. त्यातच यंदा खरेदी केलेली तूरही पडून आहे. गोदामे भरली असून, नव्याने धान्य खरेदी करून ते कुठे साठवायचे, हा प्रश्‍न शासकीय यंत्रणांसमोर आहे. यामुळे हरभरा खरेदीचा मुहूर्तही लांबणीवर पडत आहे.
 
हरभरा खरेदीची तयारी १० दिवसांपूर्वीच सुरू झाली. तीन हजार शेतकऱ्यांचे ऑफलाइन अर्ज शेतकी संघांमध्ये स्वीकारले आहेत. तसेच १२ ठिकाणी खरेदी केंद्रे सुरू करण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. त्यात पारोळा, भडगाव, यावल, चोपडा, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, जळगाव, पाचोरा, अमळनेर व चाळीसगाव येथे हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. यातील ११ केंद्रांना प्रशासनाने मंजुरी दिली असून, पारोळा येथील प्रस्तावित केंद्राला अजून मंजुरी मिळालेली नाही.
 
जिल्ह्यात यंदा हरभऱ्याचे चांगले उत्पादन आले असून, त्याचे दर मात्र बाजारात अतिशय कमी आहेत. २८०० ते ३४०० रुपये क्विंटल असे दर हरभऱ्याला बाजार समिती व इतर खासगी ठिकाणी आहेत. शासनाने ४४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर खरेदीसाठी निश्‍चित केला असून, शेतकरी खरेदी केंद्रांच्या प्रतीक्षेत आहेत.

 

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत पावसाचा कमी-...औरंगाबाद  : मराठवाड्यातील ४२१ पैकी तब्बल २७५...
कोल्हापूर, सिंधुदुर्गात पावसाची रिपरिपकोल्हापूर, सिंधुदुर्ग : सप्टेंबरच्या पहिल्या...
शेतीमाल तारण कर्ज योजनेसाठी एक कोटीपरभणी : ‘‘परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे...
पाचोरा, जामनेरातही १०० टक्के पाऊसजळगाव ः खानदेशात जळगाव, धुळ्यात या...
‘टेंभू‘चे पाणी आटपाडीत, शेतकऱ्यांना...आटपाडी जि. सांगली :  टेंभू पंपगृहातील पंपात...
‘शेतकरी सन्मान योजने‘च्या अनुदानासाठी...कळमनुरी : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत...
तीन कारखान्यावरील कारवाई अंतिम टप्प्यातसोलापूर : ‘‘सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
संत्र्याला जागतिक बाजारपेठेत पोचवण्याचे...अमरावती : जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या...
बागलाण तालुक्यात शेतातून चंदनाची चोरीनाशिक  : बागलाण तालुक्यातील नवे निरपूर येथील...
तोलाई परिपत्रक होणार रद्द पुणे ः बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या...
‘शेतकरी सन्मान’साठी २० हजार कोटी दिले...नाशिक : शेतकऱ्यांना सन्मान मिळवून देत त्यांना मदत...
‘मी शेतकरी’ आंदोलनाला गांधी जयंतीपासून...नगर : शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट हमीभाव तसेच...
शेतीपूरक व्यवसायांना राज्य शासनाची...सांगली ः अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास...
थकीत बिलासाठी मुंबईत दुग्धविकास आयुक्त...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील दुग्ध...
आर्थिक मंदीमुळे देशातील शेती क्षेत्राला...नांदेड ः सध्या प्रचंड मंदी आहे. गुंतवणूक केली जात...
सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...सातारा ः माण, खटाव, फलटण या दुष्काळी तालुक्यांना...
विषबाधेच्या चौकशीची फाइल अडली गृह...नागपूर: प्रशासन गतिमान असल्याचा दावा सरकारकडून...
मित्रबुरशींच्या संवर्धनातून लष्करी...सध्या राज्याच्या विविध भागात अनुकूल हवामानामुळे...
राज्यात लिंबांना प्रतिक्विंटल १५०० ते...सोलापुरात प्रतिक्विंटल सर्वाधिक १० हजार रुपये...
आचारसंहितेच्या धास्तीने जिल्हा परिषदेत...पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या...