देशातील हरभरा उत्पादनात घट होण्याची शक्यता 

यंदाच्या हंगामात देशातील हरभरा उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याचे इंफॉर्मिस्ट वृत्तसंस्थेच्या सर्वेक्षणात म्हटले आहे.
देशातील हरभरा उत्पादनात  घट होण्याची शक्यता In gram production in the country Likely to decrease
देशातील हरभरा उत्पादनात  घट होण्याची शक्यता In gram production in the country Likely to decrease

नवी दिल्ली : यंदाच्या हंगामात देशातील हरभरा उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याचे इंफॉर्मिस्ट वृत्तसंस्थेच्या सर्वेक्षणात म्हटले आहे. २०२०-२१ (जुलै ते जून) या काळात होणारे हरभरा उत्पादन ९६ लाख टनांच्या घरात राहणार असल्याचा अंदाज इंफॉर्मिस्टने व्यक्त केला आहे. जगभरातील दहा संस्थांना सोबत घेऊन केलेल्या या सर्वेक्षणात हरभऱ्याच्या मागील वर्षीच्या ९७ लाख टन उत्पादनात यंदा एक टक्क्याची घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

२०१९-२० मध्ये सरकारच्या ११४ लाख टन अंदाजापेक्षा खूपच कमी उत्पादन झाले होते. मध्य प्रदेशात हरभऱ्याचे घटलेले क्षेत्र यासाठी जबाबदार असल्याचे या सर्वेक्षणाचा अहवाल सांगतो. यंदाही सरकारी आकडेवारीपेक्षा उत्पादन कमी असेल असा बाजारातील तज्ज्ञांचा अंदाज आहे. 

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार या हंगामातील हरभऱ्याची पेरणी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशातील एकूण लागवडीखालील क्षेत्रात ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. महाराष्ट्र आणि गुजरातेत हरभऱ्याच्या लागवड क्षेत्रात अनुक्रमे १३ टक्के आणि ११ टक्के वाढ झाली असून, मध्य प्रदेशात हेच प्रमाण ६ टक्क्यांनी घसरले आहे. दुसरीकडे राजस्थान आणि उत्तर प्रदेशात लागवड क्षेत्रात फारसा बदल झालेला नाही. 

मध्य आणि उत्तर भारतात दिवसाच्या तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे उत्पादन किती राहील या बद्दल साशंकता व्यक्त होत आहे. काढणीच्या वेळी दिवसाच्या तापमानात वाढ झाल्यास त्याचा परिणाम जवळपास सर्व रब्बी पिकांच्या उत्पादनावर होत असतो. 

सर्वेक्षणातील ठळक मुद्दे : 

  • - हरभऱ्याचे उत्पादन ८२ ते ११५ लाख टनांच्या दरम्यान राहणार 
  • - महाराष्ट्र व गुजरातमधील वाढलेल्या क्षेत्राचा फायदा होऊ शकतो 
  • - झपाट्याने वाढणाऱ्या तापमानामुळे उत्पादन घटण्याची शक्यता 
  • प्रतिक्रिया... राजस्थान आणि मध्य प्रदेशात डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांमध्ये झालेल्या अतिरिक्त पावसामुळे उत्पादन वाढू शकते.  -राहुल चौहान, संचालक, कृषी संशोधन, आयग्रेन इंडिया प्रा. लि.  मध्य प्रदेशात हरभऱ्याचे क्षेत्र घटले असले तरी महाराष्ट्र व गुजरातमध्ये लागवड वाढली आहे. त्यामुळे एकूण उत्पादन कमी अधिक प्रमाणात स्थिर राहण्याची शक्यता आहे.  - सुरेश अगरवाल, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळ मिलर संघटना 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com