agriculture news in Marathi gram rate on five thousand Maharashtra | Page 2 ||| Agrowon

हरभरा दर पाच हजारांवर 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 7 मे 2021

यंदा हरभऱ्याचा दर शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीवर सुरुवातीलाच पोहोचला होता. बरेच दिवस चांगले दर टिकून राहिले. 

अकोला ः यंदा हरभऱ्याचा दर शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीवर सुरुवातीलाच पोहोचला होता. बरेच दिवस चांगले दर टिकून राहिले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदीसह इतर प्रतिबंध लागू होताच त्याचा बाजारपेठांवरही परिणाम पडू लागला. सुरुवातीला हंगामात ५५०० पर्यंत पोहोचलेला दर आता कधी ४९००, तर कधी ५००० पर्यंत आहे. येणाऱ्या काळात बाजार समित्या पूर्ववत सुरू झाल्यास दर पुन्हा सुधारतील, असे जाणकारांनी सांगितले. 

परतीच्या पावसामुळे तसेच सिंचनासाठी प्रकल्पात पाणी असल्याने शेतकऱ्यांनी रब्बीत यंदा हरभऱ्याची लागवड सर्वच जिल्ह्यांमध्ये वाढली होती. उत्पादनही बऱ्यापैकी झालेले आहे. हरभऱ्याची आवक बाजारपेठांमध्ये वाढण्यास सुरुवात झालेली असतानाच कोरोनाचे शुक्लकाष्ट मागे लागले. बाजार समित्यांच्या कामकाजावर याचा थेट परिणाम होऊ लागलेला आहे. काही बाजार समित्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने तेथील व्यवहार बंद करण्याची वेळ येऊन ठेपली होती. 

अशाही स्थितीत काही बाजार समित्यांमध्ये नियमितपणे खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू ठेवण्याकडे प्रशासन लक्ष देत आहे. यामुळे आवक कमी- अधिक असली तरी व्यवहार होत आहेत. अकोल्यातील बाजारात गेल्या आठवडाभरातील हरभऱ्याचे दर व आवकेचा विचार केल्यास मोठा चढ-उतार दिसून येतो. येथील बाजार समितीत २९ एप्रिलला हरभऱ्याची १११२ क्विंटल आवक झाली होती.

या दिवशी हरभऱ्याला कमीत कमी ४४०० व जास्तीत जास्त ५११५ रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. ३ मे रोजी हरभऱ्याची आवक १२७३ पोत्यांवर जाऊन पोहोचली. तर दुसरीकडे दर ५००० ते ५२०० होता. गुरुवारी (ता. ६) हरभऱ्याच्या दरात थोडी तूट दिसून आली. गेल्या काही दिवसांत हे दर सातत्याने कमी-अधिक होत आहे. 

...तर दर सुधारतील 
बाजारातील व्यवहार, वाहतूक जोपर्यंत सुरळीत होत नाही, तोवर दरांमध्ये चढउतार टिकून राहू शकतात, असा अंदाज खरेदीदारांकडून व्यक्त केल्या जात आहे. बाजार समित्यांमधील व्यवहार जितके लवकर सुरळीत होतील तितका शेतीमालाच्या दरावर चांगला परिणाम दिसू लागेल. हरभऱ्याचा वापर प्रामुख्याने डाळीसाठी, बेसनापासून तयार होणाऱ्या खाद्य पदार्थांत केला जातो. सध्या सर्वच प्रकारचे मोठे कार्यक्रम बंद आहेत. हॉटेल्समध्ये केवळ पार्सल सुविधा उपलब्ध आहेत. 

प्रतिक्रिया
हरभऱ्याला यंदा चांगले दर मिळाले. कोरोनाचे निर्बंध लागू झाल्यापासून आवक तसेच विक्रीवर परिणाम दिसून येत आहे. तरीही सध्या हरभऱ्याचा दर पाच हजारांपर्यंत मिळत आहे. निर्बंध उठल्यानंतर हरभऱ्याचे दर वाढू शकतात. 
-सुनील खटोड, खरेदीदार, अकोला  

 
 


इतर अॅग्रो विशेष
कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा पुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत मॉन्सून...
राज्यात ठिकठिकाणी धुव्वांधार पुणे : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे...
दूध उत्पादकांचे उत्पन्न पोचेल २५...गायी म्हशींमधील लिंग विनिश्‍चित वीर्यमात्रांच्‍या...
धरणक्षेत्रांत पावसाचा जोर पुणे : तीन दिवसांपासून कोकणसह, सह्याद्रीच्या...
सरळ कापूस वाण बियाण्यांचा खानदेशात...जळगाव : खानदेशात केळी पट्ट्यात सरळ वाणांची...
मॉन्सूनची वाटचाल सुरूच पुणे : उत्तर भारतात मॉन्सून दाखल झाल्यानंतर...
कृषी सचिव एकनाथ डवले रमले शिवारात नांदेड : राज्याचे कृषी सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे...
विद्यापीठाच्या कांदा बियाणे विक्रीत ‘...नाशिक/नगर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बियाणे...
कृषी पर्यटनातून शेतकऱ्यांना पूरक...पुणे ः सहकार विकास महामंडळाबरोबर झालेल्या...
कोकण, घाटमाथा, विदर्भात अतिवृष्टीचा...पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र तयार...
दूध उत्पादकांना रोज १४ कोटींचा फटका नगर ः लॉककाडउनमुळे दुधाची मागणी घटल्याचे सांगत...
महिला गटाने रुजविले शेती, पूरक...कुशिवडे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) आणि म्हाप्रळ...
डिजिटल सात-बारासाठी ५१ बँकांनी केले...पुणे : शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी डिजिटल...
कांदा बीजोत्पादनात कंपन्याच मालामाल जळगाव : खानदेशात अनेक कांदा बियाणे निर्मात्या...
‘डीएससी’अभावी हजारो कोटी पडून पुणे ः पंधराव्या वित्त आयोगाचा पाच हजार कोटी...
घृष्णेश्‍वर कंपनीची सातत्यपूर्ण उंचावती...एका गटापासून सुरुवात करून विविध उपक्रम, त्यात...
२५ एकरांत शेडनेट्‍स, आदिवासींची सामूहिक...नगर जिल्ह्यात म्हाळुंगी (ता. अकोले) परिसरातील...
विदर्भात पावसाचा जोर पुणे : मॉन्सून उत्तरेकडे सरकत असताना राज्यातील...
लिंबे तोडणीलाही महाग अकोला ः कोरोनामुळे यंदा शेतकऱ्यांना मोठा फटका...
मॉन्सून जोमात, पीककर्ज कोमात पुणे ः दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना...